ganesh chaturthi

सायंकाळी रानांत चुकलेलें कोकरुं (सावरकरांची कविता)

Updated: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (16:52 IST)
कमि कांहिं न तुजलागोनी। मी तुला दुध पाजोनी
ही रात्र गृहीं ठेवोनी। पुढति रे
उदईक येथ तव माता। आणीक कळपिं तव पाता
देईन तयांचे हातां। तुजसि रे
मग थोपटुनी म्यां हातें। आणिलें गृहातें त्यातें
तो नवल मंडळींनातें। जाहलें
कुरवाळिति कोणी त्यातें। आणि घेति चुंबना कुणि ते
कुणि अरसिक मजला हंसते। जाहले
गोजिरें कोंकरुं काळें। नउ दहा दिनांचे सगळें
मउम केश ते कुरळे। शोभले
लाडक्या कां असा भीसी। मी तत्पर तव सेवेसी
कोवळी मेथि ना खासी। कां बरें
बघ येथें तुझियासाठीं। आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी। कां बरें
तव माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली
माझीही माता नेली। यमकरें
भेटेल उद्यां तव तुजला। मिळणार न परि मम मजला
कल्पांतकाल जरि आला। हाय रे
मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्चरचि सारा
ममताही करिते मारा। वरति रे
ह्या जगीं दु:खमय सारें। हीं बांधव पत्नी पोरें
म्हणुनियां शांतमन हो रे। तूं त्वरें
तरि कांहिं न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता काहीं
उचटिलें तोंड मीं पाही। चिमुकलें
हळु दूध थोडके प्यालें। मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरुं बावरुन गेले। साजिरें
स्वातंत्र्य जयांचे गेलें। परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनीं सुख न त्यां कसलें। की खरें
लटकून छातिशीं निजलें। तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें। रविकरें
घेउनी परत त्या हातीं। कुरवाळित वरचेवरतीं
कालच्या ठिकाणावरती। सोडिलें
तों माता त्याची होती। शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे तरुंचे पाठीं। हाय रे
हंबरडे ऐकं आले। आनंदुसिंधु ऊसळले
स्तनी शरासारखें घुसलें। किति त्वरें
डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षि हा गातो
तोकडा प्रतिध्वनि देतो। मुदभरें
हे प्रभो हर्षविसि यासी। परि मला रडत बसवीसी
मम माता कां लपवींसी। अजुनि रे

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments