रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: भोपाळ , शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (11:34 IST)

राजकवी भा.रा. ताम्बे साहित्य कृती पुरस्कारांसाठी पुस्तक आमंत्रित !!!

मध्यप्रदेशात मराठी भाषेच्या संवर्धन,उन्नती आणि प्रोत्साहनासाठी, म.प्र.शासनाच्या संस्कृती विभागाच्या अंतर्गत मराठी साहित्य अकादमी तर्फे, श्रेष्ठ कृतींसाठी प्रादेशिक स्तर वर राजकवी भा.रा. ताम्बे साहित्य कृती पुरस्कार दिला जाणार आहे. असे मराठी साहित्य अकादमी चे निदेशक श्री अश्विन खरे यांनी माहिती दिली. मध्यप्रदेशच्या साहित्यकारांकडून त्यांच्या ०१ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ या अवधीत प्रकाशित / मुद्रित पुस्तक पाठविण्यासाठी जाहीर आमंत्रण देत आहे. पुरस्कार दोन विभागात आहे. पहिले मराठी कविता / नाट्य लेखन यासाठी व दुसरे (०२) मराठी कथा / कादंबरी साठी, अशा दोन विभागात प्रत्येकी रोख रक्कम ५१,०००/- तथा प्रशस्तीपत्र असे पुरस्कार दिले जातील. यात क्षेत्रीय भाषांमधून मराठी भाषेत भाषांतरीत पुस्तक पण पुरस्कारासाठी पात्र असून ग्राह्य केले जातील. या साठी आणखी माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ,०७५५-२७७३१११ या नंबर वर संपर्क करावा.
 
कृपया नोंद घ्यावी  अकादमीच्या या पुस्तक पुरस्कारासाठी भाग घेणाऱ्या साहित्यकारांचे त्यांच्या ०१ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ या अवधीत प्रकाशित / मुद्रित पुस्तकांच्या फक्त प्रथम आवृत्तीसाठीच हा पुस्कार असणार आहे याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी. कोणत्याही स्थितीत ३१. डिसेंबर २०१५ नंतर प्रकाशित / मुद्रित पुस्तक स्वीकार केले जाणार नाही. हा पुरस्कार फक्त मध्यप्रदेशच्या निवासी मराठी भाषिक साहित्यकारांसाठीच आहे .यांचा स्पष्ट अर्थ असा की लेखकाचा / कवीचा जन्म मध्यप्रदेशात झालेला असावा किंवा लेखक / कवीचा गेल्या दहा वर्षांपासून ( दिनांक ३१ डिसेंबर २००३ च्या अगोदर पासून ) मध्यप्रदेशात निवास असावा .तत्संबंधी जन्मप्रमाणपत्र किंवा निवासी प्रमाणपत्र पुस्तकासोबत पाठविणे बंधनकारक असेल याची संबंधितानी कृपया नोंद घ्यावी. इतर व्यक्ती / संस्थाने पुरस्कारासाठी पुस्तक धाडल्यास , लेखक / कवी / त्यांचे वारस किंवा प्रकाशकाची लेखी सहमती धाडणे बंधनकारक असेल. पाकिटावर ज्या पुरस्कारासाठी पुस्तक पाठविण्यात आले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. पुरस्कारासाठी पुस्तकं, निदेशक, मराठी साहित्य अकादमी, संस्कृती परिषद, रवींद्रनाथ टेगोर मार्ग, बाणगंगा रोड, भोपाळ म.प्र. पिनकोड-४६२००३ या पत्यावर पाठविणे.