रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: रविवार, 3 नोव्हेंबर 2024 (12:41 IST)

चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला

चिंधी बांधिते द्रौपदी,
हरिच्या बोटाला !
भरजरी फाडुन शेला,
चिंधी बांधिते द्रौपदी
हरिच्या बोटाला
 
बघून तिचा तो भाव अलौकीक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक
कर पाठीवर पडला अपसुक
प्रसन्न माधव झाला, 
चिंधी बांधिते द्रौपदी,
हरिच्या बोटाला !
 
म्हणे खरी तू माझी भगिनी
भाऊ तुझा मी दृपद नंदिनी
साद घालिता येईन धावुनी
प्रसंग जर का पडला,
चिंधी बांधिते द्रौपदी
हरिच्या बोटाला !
 
प्रसंग कैसा येईल मजवर
पाठीस असशी तू परमेश्वर
बोले कृष्णा दाटून गहिवर
पूर लोचना आला,
चिंधी बांधिते द्रौपदी,
हरिच्या बोटाला !
 
गीत : ग. दि. माडगूळकर  
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले
चित्रपट : झेप (१९७१)