1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: रविवार, 3 नोव्हेंबर 2024 (12:24 IST)

ओवाळीते मी लाडक्या भाऊराया

Lyrics Jagdish Kheboodkar
चंद्र हा गगनी हासतो बघुनी
चांदणे शिंपुनी करी माया
ओवाळीते मी लाडक्या भाऊराया
 
दिवाळीची शोभा या
उजेडात न्हाली
कळस होऊनी भाऊबीज आली
जन्मोजन्मी मिळू दे तिची छाया

डोळे दोन ज्योती तेवती मंद मंद
ममता फुलवी जाईचा सुगंध
अतुरली पूजेला माझी काया
 
गुणी माझा भाऊ
याला ग काय मागू
हात जोडुनिया देवाजीला सांगू
औक्ष माझं वाहू दे त्याच्या पाया
 
  गीत : जगदीश खेबूडकर  
  संगीत : प्रभाकर जोग
  स्वर : शिवांगी कोल्हापुरे
  चित्रपट : ओवाळीते भाऊराया
  (१९७५)