Daily Horoscope
✕

बेडशीट्‌स खरेदी करताना...

Updated: शनिवार, 14 डिसेंबर 2019 (15:11 IST)
कारण आपण बेडवर दिवसभरातील अनेक तास घालवतो. त्यामुळे बेडशीटही ऊत्तम आणि कंफर्टेबल असणं आवश्यक आहे. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला देत आहोत बेडशीट खरेदीबाबतच्या काही टिप्स :  
 
ऋतू आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही बेडशीटची निवड करा. कारण जी बेडशीट दुसर्‍यांच्या घरी चांगली दिसते, तिच तुमच्याकडेही सूट होईलच असं नाही. कारण प्रत्येक घराची रचना, रंग आणि लोकांची आवडही वेगळी असते. उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन बेडशीट्‌सची निवड योग्य आहे तर थंडीच्या दिवसात तुम्ही सिल्क, सॅटीन किंवा लिननसारख्या बेडशीट्‌सचा वापर करू शकता. 
ज्या बेडशीट्‌स रोज वापरायच्या असतील त्या रिंकल फ्री असतील याची काळजी घ्या. कारण रोजच्या वापरासाठी रिंकल फ्री बेडशीट घेणं कधीही चांगलं आणि त्या सहज धुताही येतात. 
 
जेव्हा तुम्ही कॉटन बेडशीट्‌स खरेदी करता तेव्हा त्याच्या साईजकडेही विशेष लक्ष द्या. कारण कधी कधी धुतल्यानंतर चादरी आटतात. त्यामुळे चादर खोचणंही कठीण होतं. त्यामुळे बेडशीट्‌स खरेदी करताना माप आणि फॅब्रिकची निवड योग्य करा. जी बेडशीट तुम्हाला नीट खोचता येईल. आजकाल कॉटन बेडशीट्‌समध्येही खूप व्हरायटी मिळते. जसं प्युअर कॉटन, मिक्स कॉटन, नॉन-रिंकल कॉटन, हँडलूम कॉटन इ. 
बेडरूमला सुंदर बनवण्यासाठी आणि लक्झरी लूक देण्यासाठी रंगसंगतीचं कॉर्डिनेशनही महत्त्वाचं आहे. खोलीतील स्टाईल आणि रंग लक्षात ठेवून बेडशीट्‌स खरेदी करा. काही जण बेडशीट्‌स खरेदी करताना रंगसंगतीकडे लक्ष देत नाहीत. हे जर इतकं महत्त्वाचं नसलं तरी बेडशीट आणि कलर कॉर्डिनेशनमुळे तुमच्या बेडरूमच्या लूकमध्ये नक्कीच फरक पडतो.. कधी कधी खास समारंभाच्या निमित्ताने तुम्ही वेलवेट किंवा सिल्क बेडशीट्‌सचाही वापर करू शकता.
 
जसं लग्र, सणवार किंवा पार्टी असल्यास असे पर्याय तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमच्या बेडरूमला नक्कीच क्लासी लूक मिळेल.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

बटाट्याचा कंटाळा आला असेल तर उपवासासाठी बनवा रताळ्याच्या कुरकुरीत टिक्की; चवीला अप्रतिम

वजन घटवण्यासाठी सुका मेवा कसा भिजवावा? जाणून घ्या योग्य पद्धत

१२वी PCM आणि JEE Main उमेदवारांसाठी भारतीय लष्करात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

ऑनलाईन शॉपिंग करताना त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट पावडर कसे निवडावे ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments