मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (17:04 IST)

सोफा खरेदी करताना ही काळजी घ्या

सोफा बेड फर्निचरचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. सोफा बेड हे एक ल्टिपर्पज असते. सोफा बेड तुम्ही सोफा  किंवा बेड असा दोन्ही वापर करू शकता. घरात पाहुणे आले तरी याचा चांगला वापर होऊ शकतो. मात्र सोफा बेड खरेदी करताना त्याच्या लुक ऐवजी त्याच्या काही खास क्वॉलिटीजवर लक्ष देणे गरजेचे आहे.
 
उद्देश लक्षात ठेवा
सोफा बेड खरेदी करण्यापूर्वी तुचं प्राधान्य काय आहे यावर लक्ष द्या. या सोफा बेडचा वापर तुम्हांला जास्त बसण्यासाठी कि झोपण्यासाठी करायचा आहे हे लक्षात घ्या. सोफा बेड्‌समध्ये दोन्ही गोष्टी परफेक्ट मिळणे  हे थोडे अशक्य असते. त्यासाठी खरेदी करण्यापूर्वीचं लक्षात ठेवणे गरजेचे आहे की 
आपल्याला नेमकं कशापद्धतीचा सोफा घ्यायचा आहे. तर खरेदी करायला गेल्यावर तपासून घ्यावे की सोफा झोपण्यासाठी वा बसण्यासाठी जास्त कंफर्टेबल आहे. विशेष करून लक्ष द्यावे की, मान आणि पाठीला किती सपोर्ट मिळत आहे.
 
व्यवस्थित तपासून घ्यावा
सोफा बेड खरेदी करताना तो खोलताना आणि बंद करताना काही अडचणी येत नाहीत ना हे देखील तपासून घ्यावे. नॉर्मल  सोफ्यापेक्षा हा सोफा बेड जास्त जड असतो कारण यात दोन्ही गोष्टी मिळतात. त्यामुळे खरेदी करतानाच तपासून घ्यावे की सोफा बंद करताना आणि खोलताना काही अडचण येत नाही आहे. तसेच सोपा बेड असा खरेदी करावा की एक व्यक्ती तो खोलू आणि बंद करू शकेल. 
 
बजेट आणि जागा यावर लक्ष द्यावे  
कोणतंही सामान खरेदी करायला जाताना एक बजेट नि‍श्चित करावे आणि त्यानुसार मॉडल्स बघावे. त्याव्यतिरिक्त ज्या जागेवर सोफा बेड ठेवायचा आहे आणि तुम्ही किती जागेत तो ठेवणार आहात हे निश्चित करून त्यापद्धतीचा सोफा बघावा. तसेच बेड आणि सोफा दोन्ही रूपात त्या जागेचं माप घेऊन
जाणे आवश्यक आहे.
 
सोफ्याची जाडी
सोफा बेडचं मॅट्रेस देखील तपासून घ्यावे. सोफा बेडपेक्षा कमीत कमी 5 इंच मोठी मॅट्रेस घ्यावी. 4 इंचाहून कमी मॅट्रेस घेऊ नये नाहीतर असुविधा होऊ शकते.
 
कलर आणि डिझाईन
सोफा बेड खरेदी करताना तुच्या घराचं इंटिरिअर काय आहे ते लक्षात ठेवावे आणि त्यानुसार सोफा बेड खरेदी करावा. सोफा बेड खरेदी करताना त्याची डिझाईन आपल्या घराला शोभेल अशी घ्यावी.