गुरूवार, 23 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (12:21 IST)

रुसलेल्या बायकोला मनवण्याचे अगदी सोपे उपाय, अमलात आणू बघा

नवरा- बायकोत भांडण, वाद होणे अगदी साहजिक आहे. अनेकदा नवर्‍याच्या काही गोष्टी बायकोच्या मनात घर करतात आणि तिची वागणूक बदलते पण नवर्‍याला याबद्दल जाणीव देखील होत नाही. अनेकदा जाणीव असली तरी ती तिचं मूड आपोआप चांगलं होईल असे गृहीत धरून नवरा स्वत:चा घोडा अडत नाही तोपर्यंत तिच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतू वेळेवर बायकोला मनवले तर सर्व काही सुरळीत होऊ शकतं. यासाठी खूप काही करण्याची गरज नाही केवळ हे सोपे उपाय अमलात आणू बघा:
 
घरकामात मदत
रुसलेल्या बायकोच्या जवळपास राहण्यासाठी घरकामात हातभार लावा. या गोष्टींसाठी बायको आपल्याला दररोज टोकते ती गोष्ट स्वत:हून करा. जसे टॉवेल जागेवर ठेवणे. चहाचा कप उचलून बेसिनमध्ये ठेवणे किंवा वृत्तपत्राची घडी करून ठेवणे, मुलांची जबाबदारी घेणे इतर... अशाने तुम्ही करत असलेली मेहनत तिला कळून येईल आणि तिचा राग घालवण्यात मदत होईल.
 
कारण विचारा
आपल्याला नक्की काय घडलंय किंवा कोणत्या चुकीमुळे मूड गेलेय हे कळत नसेल तर स्पष्ट बोलून कारण विचारणे योग्य ठरेल. कारण कळल्यावर गाठी सोडवणे सोपे जाईल.
 
बेस्ट ऑप्शन शॉपिंग
महिलांचं मूड शॉपिंग केल्याने लगेच बदलतं. हा उपाय खर्च वाढवणारा असला तरी शॉपिंग केल्यावर तिचं बदलेल मूड बघून आपलं टेन्शन मात्र नक्कीच गायब होईल.
 
अटेन्शन द्या
नाराज बायको चूप राहते. अशात तिच्या मागे-पुढे करत राहा. स्वत: बोलण्याचा प्रयत्न करा. तिच्याकडे अधिक लक्ष द्या. तिचं आवड-निवड जपा. अशाने राग लवकर दूर होईल.
 
तिच्या पसंतीची डिश बनवा
हृद्यापर्यंत पोहचण्यासाठी पोट उत्तम मार्ग असल्याचे म्हणतात आणि व्यक्ती नाराज असला तरी त्याची आवडती वस्तू समोर आल्यावर कंट्रोल करणे कठिण जातं. अशात तिला आवडत असलेली एखादी डिश स्वत: तयार करा किंवा फेव्हरेट रेस्टॉरंटहून ऑर्डर करून मागवा.