रागीट स्वभावाच्या जोडीदाराला या प्रकारे करा हँडल
कधी-कधी राग येणे काळजीचे कारण नाही परंतू राग स्वभावातच असेल तर त्याचा प्रभाव नात्यांवर पडू लागतो. आपल्या जोडीदार देखील रागीट स्वभावाचा असेल तर हे टिप्स आपल्यासाठी कामाचे ठरतील-
- पार्टनरला कोणत्या गोष्टीवर अधिक राग येतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासमोर त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.
– आपल्या काही सवयी पार्टनरला आवडत नसतील म्हणून असे कृत्य त्यांच्यासमोर करणे टाळा.
– दुसर्यांवर आरोप लावणे व वादाला जन्म देणे रागीट लोकांच्या स्वभावात असतं अशात त्यांच्या अशा प्रकाराच्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा.
– त्यांचं ऐका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका अशाने ते डिप्रेशनच्या बळी पडू शकतात. पार्टनर रागात असताना त्याची मानसिक स्थिती समजण्याचा प्रत्यन करा. हळू-हळू राग
दूर होईल.
– त्यांचा मूड चांगला असेल तेव्हा त्यांच्या वाईट स्वभावाबद्दल प्रेमाने चर्चा करा. त्यांच्या स्वभावामुळे किती त्रास सहन करावा लागतो हे प्रेमाने सांगा.
– आपली चुक असेल तर मान्य करा. सॉरी म्हटत असल्यामुळे वाद मिटत असेल तर ताण निर्मित होण्यापासून वाचता येईल.
– पार्टनरला राग आल्यावर चुप राहा असे न सांगता त्यांना वेळ द्या. ते स्वत: शांत होतील.
– रागात असताना उगीच चर्चा करु नये याने वाद वाढतो.
– धैर्य राखा. परिस्थिती आपोआप सामान्य होईल मग पार्टनरला त्याची चूक सांगा.