शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (18:18 IST)

लॉक डाऊन मध्ये जोडीदाराशी वेगळे राहून कंटाळला असाल तर असा वेळ घालवा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाऊन लावण्यात आले आहे. ज्यामुळे लोकांना घरीच राहावे लागत आहे. लोक घरात राहून देखील कंटाळले आहे. अशा परिस्थितीत घरात राहून आपण या काही टिप्स अवलंबवा या मुळे आपला कंटाळा दूर होईल.
 
* मित्रांशी गप्पा करा-आपल्या आयुष्यात शाळा ते महाविद्यालय आणि इतर बर्‍याच ठिकाणी असे बरेच मित्र असतील ज्यांच्याशी आपण बर्‍याच दिवसांपासून बोलू शकत नसाल. तर अशा परिस्थितीत लॉक डाऊन मध्ये त्यांच्याशी बोलून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्या. आणि आपले दुरावलेले नाते दृढ करा.
 
* काही तरी नवीन शिका- आपण आपल्या दरोजच्या दैनंदिनीचे काम करतो, परंतु आपल्या मनात कुठेतरी काही नवीन शिकायची इच्छा असते.जे आपण वेळेअभावी करू शकत नाही.परंतु आपल्याकडे वेळ असल्यास ते या वेळेचा चांगला सदुपयोग करा आणि जे काम शिकायची इच्छा होती ते शिकून घ्या.  
 
* कुटुंबासमवेत वेळ घालवा-कधी शाळा,तर कधी ऑफिस,कॉलेज आपण नेहमी आपल्या कामात व्यस्त असतो, परंतु आपल्याकडे सध्या  वेळ आहे कारण लॉक डाऊन मुळे आपण घरातच आहात, अशा परिस्थितीत आपला वेळ आपल्या कुटुंबियांसमवेत घालवा.त्यांच्याशी बोला,त्यांचे दुःख ,सुख जाणून घ्या.त्यांच्या समवेत मनमोकळे गप्पा करा.त्यांना कामात मदत करा.असं केल्याने त्यांना देखील चांगले वाटेल.तसेच आपला वेळ देखील चांगला जाईल.
 
* उर्वरित जुनी कामे पूर्ण करा- अशा बऱ्याच गोष्टी असतात जे आपण वेळे अभावे पूर्ण करू शकत नाही. आपण किती ही ते कामे करण्याचा प्रयत्न केला तरी ही आपल्याला ती कामे वेळे अभावे पूर्ण करता येत नाही. अशा परिस्थितीत आपली ती उर्वरित कामे पूर्ण करा.