शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (18:09 IST)

लॉकडाउन मध्ये ऑनलाईन डेटिंग करताना ही काळीज घ्या.

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन लागले आहे. या मुळे लोक आपापल्या घरात आहे. घरात राहावे लागत आहे या मुळे लोक कंटाळवाणी झाले आहेत. काही तरुण वर्गाचा कल या काळात ऑनलाईन डेटिंग कडे वाढत आहे. परंतु ही ऑनलाईन डेटिंग कितपत सुरक्षित आहे. तसेच ऑनलाईन डेटिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी आणि खबरदारी घेतली पाहिजे जाणून घ्या. 
 
* आपले फोटो सामायिक करू नका- जेव्हा आपण एखाद्याशी डेटिंगच्या माध्यमातून जुडतो तेव्हा आपण त्याच्याशी मन मोकळ्या गप्पा करतो. आपण आपले नंबर सामायिक करतो. अशा वेळी आपण त्या अनोळखी व्यक्तीशी  न कळत जुडत जातो.लक्षात ठेवा की आपण आपले फोटो सामायिक करू नये. तो अनोळखी व्यक्ती त्या फोटोंचा गैर वापर देखील करू शकतो.
 
* आपल्या व्यक्तिगत गोष्टी सामायिक करू नका- ऑनलाईन डेटिंग करताना ही काळजी घ्या की आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या कोणत्याच गोष्टी त्या अनोळखी व्यक्तीशी सामायिक करू नका. जर आपल्या खासगी एखाद्या चुकीच्या माणसाच्या जवळ गेल्या तर तो याचा गैर वापर करून आपल्याला अडचणीत टाकू शकतो.म्हणून या दरम्यान काळजी घ्या. 
 
*  भेटण्याच्या जागेचा विचार करा- आपण ऑनलाईन डेटिंग करत आहात आणि जर आपल्याला भेटायला जायचे असेल तर लॉक डाऊन नंतर कुठे भेटायचे आहे याची काळजी घ्या. एकांतजागी भेटायला जाऊ नका.     
 
* व्हिडियो सामायिक करू नका- ऑनलाईन डेटिंग मध्ये काही काळाच्या ओळखी नंतर लोक आपले व्हिडीओ सामायिक करतात. असं करू नका. सध्या चांगल्या व्हिडीओंना देखील खराब करण्याचे सॉफ्टवेयर आहे .या मुळे आपल्या व्हिडिओचा गैरवापर केला जाऊ शकतो. म्हणून व्हिडीओ शेयर करताना समोरच्या माणसाचा विचार करा.