लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही टिप्स
सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात लॉकडाऊन लावले आहे.अशा परिस्थितीत, आजकाल बरेच जोडपे घरी देखील आहेत आणि बर्याच दिवसानंतर लोकांना एकत्र वेळ घालवण्यासाठी वेळ मिळाला आहे. या वेळेला अधिक रोमँटिक करण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.ज्यामुळे आपण आपल्या जोडीदारासह अधिक रोमँटिक वेळ घालवू शकाल.
* घरातील कामात मदत करणे -आपण आपल्या जोडीदारास घरातील कामात मदत करू शकता. आपण एकत्र स्वयंपाक करू शकता, घरगुती स्वच्छता करू शकता आणि एकत्ररित्या काम करू शकता.या मुळे आपल्या जोडीदाराला आनंदच होईल.
* स्वयंपाकात मदत करा-आपण आपल्या जोडीदारासाठी स्वयंपाक करू शकता. आपण त्यांच्यासाठी त्यांची आवडती डिश बनवू शकता.या मुळे आपसातील प्रेम वाढेल.
* भेट वस्तू देऊन -भेट घेणं कोणाला आवडत नाही. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या जोडीदाराने त्यांना काही भेट वस्तू द्यावी. आपण आपल्या या लॉक डाउनच्या काळात ऑनलाईन ऑर्डर करून काही भेटवस्तू देऊ शकता. या मुळे आपला जोडीदार आनंदी होईल आणि आपल्यावर त्याचे अधिकच प्रेम वाढेल. ऑनलाईन सामान मागवताना काळजी घ्या.
* कँडल लाईट डिनर- सध्या कोरोनामुळे आणि लॉक डाऊन लागल्यामुळे बाहेर जाणे शक्य नाही. आपण घरीच कँडल लाईट डिनर चे आयोजन करू शकता. हे आपल्यातील प्रेम वाढविण्याचे काम करेल.