गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (19:08 IST)

साथीचा रोग असो किंवा साधा रोग, आपल्यात आहे पराभूत करण्याची शक्ती

कोरोनाव्हायरसपासून मुक्त होण्यासाठी सावधगिरीने आणि विवेकीपणाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. या कोरोनापासून आत्ताच आराम मिळण्यासाठी कोणताही प्रभावी उपचार नाही. परंतु तज्ञ, डॉक्टर या विषाणूचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा  सल्ला देत आहेत. जर आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर आपण कोणत्याही रोगाशी लढू शकता. आपली प्रतिकारशक्ती मजबूत असताना कोणता ही व्हायरस आपल्यावर वर्चस्व राखू शकत नाही. परंतु आपण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपल्या दिनचर्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत याबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे, आणि कोणत्या गोष्टींचा सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते  हे जाणून घ्या.  
 
सर्वप्रथम जाणून घेऊ या की प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहे?
 
* नियमित योगाभ्यास
शरीराला आतून मजबूत ठेवण्यासाठी नियमित योग करणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शारीरिक व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.
 
* शारीरिक क्रिया
शारीरिक क्रियेकडे अधिक लक्ष द्या. शारीरिक क्रियाकलापांद्वारे आपण सक्रिय रहाल आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल. यासाठी, आपण खेळांचा समावेश करू शकता जेणेकरून शरीराचा व्यायाम होईल आणि मानसिकदृष्ट्या देखील ताजे तवाने वाटेल.
 
* बाहेरचे खाऊ नका
घरात बनलेले शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे.आपण व्हायरसपासून अंतर ठेवू इच्छित असल्यास स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी, आपल्यात  हा बदल समाविष्ट करणे आणि शुद्ध घरगुती अन्न खाणे आवश्यक आहे. 
 
* व्हिटॅमिन सीचे सेवन
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन-सी घ्या. यासाठी आवळ्याचे सेवन करा.
 
* फळे आणि हिरव्या पाले भाज्या खा-
आपल्या आहारात फळांचा समावेश करा. हिरव्या पाले भाज्या खा. हे आपल्या रोगप्रतिकार शक्तीला  मजबूत करेल आणि कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढण्याची शक्ती देईल.
 
* तुळशीचे सेवन
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळस घ्या. दर रोज तुळस अनोश्या पोटी खाऊ शकता.
 
सर्वात मोठी म्हणजे मनाची शक्ती, आपल्या मनास सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त करा, मेंदूला चांगल्या विचारांनी समृद्ध करा. चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या दिशेने चुकत आहात  हे जाणून घ्या. दररोज ध्यान करा. चांगल्या गोष्टी करा आपल्या उर्जेचा उपयोग करा. सर्जनशील आणि सतत सक्रिय बना.
 
रोग प्रतिकारक शक्ती कोणत्या गोष्टींमुळे कमकुवत होते जाणून घ्या-
जर आपण मैद्याने बनवलेल्या गोष्टींचा जास्त सेवन करता तर त्यांचे त्वरित सेवन करणे थांबवा. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक होऊ शकत. मैद्यापासून बनवलेले हे पदार्थ जसे की ब्रेड, नान,भटुरे, पिझ्झा इत्यादी 
 
*साखरेचे सेवन करू नका, साखरे ऐवजी आपण गूळ घेऊ शकता.
 
* आपण कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे शौकीन असल्यास, आपल्या छंदात बदल करण्याची वेळ आली आहे. कोरोना युगात, जेव्हा नित्यकर्मांमध्ये बरेच बदल झाले आहेत  आणि लोकांना निरोगी आयुष्याकडे जाण्याची ओढ लागली आहे  तेव्हा यासाठी आपल्याला त्या सर्व सवयींचा त्याग करावा लागेल, ज्यामुळे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू  शकते.
 
* पॅक्ड गोष्टी खाणे टाळा-
 
* जंकफूडचा वापर टाळा, हे रोगप्रतिकार शक्ती कमी करण्याचे  कार्य करते.
 
आपण कोरोनाव्हायरसशी सामना करण्यासाठी आपल्या आहारात आणि आपल्या जीवनशैलीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केल्यास या विषाणूचे स्वतःवर वर्चस्व होण्यापासून रोखले जाऊ शकते. आता आपल्यात बदल करण्याची  वेळ आली आहे. कोरोना कालावधीतील बदल करून आणि समजूतदारीने घेतलेले पाऊल आपल्याला निरोगी जीवनाकडे नेईल, म्हणून या विषाणूपासून घाबरू नका, परंतु स्वतःला आतून बळकट करा आणि या विषाणूचा पराभव करा.