कोरोनाच्या काळात हे नियम अवलंबवा,आरोग्य सुधारेल आणि नाते दृढ होतील
कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे प्रत्येक जण अस्वस्थ आहे. लॉक डाऊन मुळे लोक घरातच आहे. घरात राहून आपण काही नियम पाळून आपले आरोग्य आणि नाते देखील सुधारू शकता. चला जाणून घेऊ या.
* सकाळी लवकर उठा-सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागले आहे. त्यामुळे लोक घरातच आहे. असा परिस्थितीत,सकाळी लवकर उठावे. कारण सकाळी लवकर उठल्याने मेंदू तंदुरुस्त होतं.तसेच लवकर उठल्याने आपण आपल्या कुटुंबासह अधिक वेळ घालवू शकता.
* योगा आणि व्यायाम करा- आपण घरात आहात,तर योग आणि व्यायाम करू शकता. कोरोनाच्या कालावधीत स्वतःला फिट आणि निरोगी ठेवणं महत्त्वाचे आहे. किमान दररोज सकाळी 30 मिनिट व्यायाम किंवा योगा केले पाहिजे. या मुळे आपल्यातील आळस देखील दूर होईल.
* सकाळी उठल्यावर ज्येष्ठांना अभिवादन करा- सकाळी उठल्यावर आपल्या घरातील ज्येष्ठांना आदर द्या,घरातील ज्येष्ठांना वाकून नमस्कार करा. असं केल्याने दिवस चांगला जाईल आणि मुलांवर देखील चांगले संस्कार लागतील. तसेच नात्यात देखील गोडवा येईल.
* कुटुंबाला वेळ द्या- कोरोनामुळे आपण घरातच आहे सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे अशा वेळी आपण कामाला वेळ दिले पाहिजे तसेच काम संपल्यावर लॅपटॉप,मोबाईल न हाताळता कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. या कठीण काळात आपण त्यांना वेळ द्याल तर कुटुंबियातील सदस्यांना छान वाटेल आणि आपले नाते अधिक दृढ होतील.