मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (16:57 IST)

ह्या 5 गोष्टी सुनांनी अंगीकारात आणल्या तर सासूसोबत त्यांचे नाते दृढ होऊ शकतात

भारतीय समाजात लग्न दोन व्यक्तींमध्ये न होता दोन कुटुंबात होत. अशात मुलींसमोर आपल्या सासरच्या मंडळींसोबत सामंजस्य बसवणे फारच गरजेचे असते. या प्रयत्नात सर्वात कठिण सासूशी तालमेल बसवणे मानले जाते. पण समजूतदारी आणि प्रेमाने हँडल केले तर हे का सोपं होऊ शकत. जर ह्या 5 गोष्टी ज्यांना सुनांनी अंगीकारात आणल्या तर त्या दोघींचे संबंध दृढ होऊ शकतात.
 
आपला दृष्टिकोन बदलावा
तुमची सासू तुमच्या प्रत्येक कामात कमतरता मोजते. आणि ही सवय जर दिवसोंदिवस वाढत असेल तर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. प्रत्येक कामात सफाई देणे किंवा तक्रार करण्यापेक्षा चांगले आहे की चूप राहा. बीनं कारण बोलणे अनावश्यकपणे टाळा. तुमचे उत्तर न दिल्याने त्यांचा स्वभाव नक्कीच बदलेल. या विषयात संयम दाखवणे फारच गरजेचे आहे.
 
प्रशंसा करू द्या  
जर तुमची सासू स्वत:ची तारीफ करण्याचा एक ही मोका सोडत नसेल किंवा तुमचा नवरा आईच्या हाताच्या स्वयंपाकाची तारीफ करत थकत नसेल तर रागावू नका. काही म्हणा ती तुमच्या नवर्‍याची आई आहे आणि आईच्या हाताच्या जेवणाची गोष्ट काही औरच असते, ही गोष्ट तुम्हाला ही चांगल्या प्रकारे ठाऊक असेल.
 
कमी बोला
तुम्हाला अस वाटत असेल की जास्त बोलल्याने सासूसोबत विवाद होण्याची शक्यता असेल तर समजूतदारी अशातच आहे की चूप बसा. तुमची चुप्पी त्यांना परेशान करेल पण त्यांना चर्चा करण्याचा कुठलाही मोका देऊ नका. तसे देखील जास्त बोलल्याने काही चुकीचे बोलण्याची शक्यता जास्त असते. तुमचा असा व्यवहार तुमच्या दोघींमध्ये होणार्‍या तक्रारीशी तुम्हाला वाचवेल.
 
मुले आणि आजी यांच्यात जाऊ नका 
आपले मुलं आणि सासूच्या मध्ये जाऊ नका. कारण आजी आणि नातवंडातील नात फारच खास असत. ती सर्वात जास्त तुमच्या मुलांना प्रेम करेल. या गोष्टींमुळे तुम्हाला आनंदी व्हायला पाहिजे. मुलं आपल्या आजी आजोबांकडून बरेच काही शिकतात. ते त्यांना नेहमीच त्यांना चुकीचे आणि योग्य गोष्टींचे स्पष्टीकरण देतात.
 
कामाबद्दल वाद घालू नका
तुम्ही घरातील सून आहात कोणती मशीन नाही की सर्व काम एकाच दमात कराल. एका वेळेस तेवढेच काम हातात घ्या जेवढे करू शकता. गरजेपेक्षा जास्त कामामुळे तणाव, थकवा आणि चिडचिडापण होईल. म्हणून गरजेचे आहे की हिंमत करून स्पष्टरूपेण आपले काम सांगून द्या ज्यामुळे कामामुळे वाद होणार नाही.