जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी हे अवलंबवा
प्रत्येकाच्या जीवनात दुःख आणि सुख येतातच आपल्या जोडीदाराला कसे आनंदी ठेवायचे हे समजत नाही. बऱ्याच वेळा कळत नकळत अश्या काही गोष्टी घडतात ज्यामुळे नाती बिघडतात. आपण जोडीदाराला संतुष्ट कसे कराल किंवा त्याला आनंदी कसे ठेवाल ते जाणून घेऊ या .
* त्याची निवड समजून घ्या-
जोडीदारास आनंदी ठेवायचे असल्यास त्याला समजून घ्या त्याच्या आवडी निवडी समजून घ्या. कुठे फिरायला आवडते काय पाहिजे हे जाणून घ्या. असं केल्यानं आपण त्यांना आनंदी ठेवू शकता.
* त्यांचे कौतुक करा-
आपण नेहमी त्यांचे कौतुक करा. असं केल्यानं त्यांना उत्साह वाटेल आणि ते काम आनंदाने करतील.
* जोडीदाराचे ऐका-
बऱ्याच लोकांना जास्त बोलण्याची सवय असते ते समोरच्याला बोलूच देत नाही. असं करू नका त्याला ही बोलूं द्या त्याला त्याचे विचार मांडू द्या. या सर्व गोष्टींची आपण काळजी घ्यावी .
* त्याची काळजी घ्या-
जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी तिचा वाढदिवस, तिला पुरेसा वेळ द्या. त्यांना आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला घेऊन जा. असं केल्यानं त्यांना आनंद मिळेल.