बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

वधूसाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Bride

ukhane
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद
 
कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,
…राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती
 
राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला
 
मंदिरात वाहते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान
 
लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती
 
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी
 
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल
 
कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा
 
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा
 
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने
 
पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे
 
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,
… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती
 
माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे
 
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला
 
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेताना, कसला आला आळस
 
पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते
 
ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल
 
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा
 
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार
 
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे
 
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी
 
सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान
 
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
…चे नाव घेते तुमच्या साठी!
 
श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन
 
घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लाजेने चढली लाली
 
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,
घडविले दैवांनी… रावांना जीव लावून
 
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत
 
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार
 
पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं,
…रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन
 
चांदीचे जोडवे पतीची खूण,
.. रावांचे नांव घेते,… ची सून
 
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे
 
डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले
 
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा
 
नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे
 
स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी,
…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी
 
…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा
 
तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले
 
मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रूप मला फार आवडले
 
मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा
 
शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन
 
प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची
 
चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती
 
नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार
 
करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड
 
सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले
 
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
...रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले
 
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
 
शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
आता ….राव माझे जीवनसाथी
 
मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर