शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

आपल्या लहानपणीचे आईचे काही फेमस डायलॉग

आपल्या लहानपणीचे आईचे काही फेमस डायलॉग
१. आई भूक लागली ...
"सारखं काय द्यायचं तुम्हाला खायला, आता मलाच खा"
(दहा मिनिटात आपल्यासमोर काहीतरी खायला असायचं तो भाग वेगळा)
 
२. सकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं...अती त्राग्याने..
" मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं? 
एक एक दिवस अगदी परीक्षाच असते
(त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)
 
३. आई वेणी घालून दे ना...
" एवढी घोडी झाली तरी आई लागते वेणी घालायला"
कृतःकोपा ने प्रेमळ धपाटा ..
(बोले पर्यंत वेणी घालून पण होते ते निराळं )
 
४. " किती पसारा करता रे..आवरताना जीव मेटाकुटीस येतो, शिस्त नाही तुम्हाला, माझंच चुकलं, चांगले दणके द्यायला हवे होते.."