गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (08:15 IST)

प्रेरणा टिप्स : श्रीमंत झाल्यावर माणूस या चुका करतो

आयुष्यात यश आणि अपयश  येतातच बऱ्याच वेळा असे बघण्यात येते की ज्यांच्या कडे अचानक पैसा आला आहे किंवा जे अचानक श्रीमंत झाले आहे त्यांचा मध्ये गर्व येतो. गर्व आल्यावर तो तीन प्रकारचे वर्तन करतो. 
 
1 आपल्या माणसांना विसरतो- कोणताही माणूस स्वतःच्या बळावर नव्हे तर कुटुंबा मुळे, नातेवाइकांमुळे,मित्रामुळे यशस्वी होतो किंवा श्रीमंत होतो. परंतु बऱ्याच वेळा तो यश मिळाल्यावर आपल्या माणसांनाच विसरतो. असं करू नये. नेहमी उंच उडणारा खाली पडतोच. उंचाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे नातेवाईक त्याला मोलाची साथ देतात. परंतु तो उंचाच्या शिखरावर जाऊन आपल्याच माणसांना हीन दृष्टीने बघू लागतो आणि त्यांचा दुराभाव  करतो. एकाद्या वेळी तो अपयशाला समोरी गेल्यावर खाली आल्यावर त्याच लोकांसमोर येतो ज्यांनी कधीकाळी त्याची यशस्वी होण्यासाठी मदत केली होती. 
 
2 उपदेशक बनतात- यशस्वी माणूस स्वतःला ज्ञानी समजू लागतो. अशा परिस्थितीत तो सगळ्यांना उपदेश देऊ लागतो. स्वतःला श्रेष्ठ समजून दुसऱ्यांना गरज नसताना उपदेश देऊ लागतो. त्याच्या कडे ज्ञान असो किंवा नसो तरीही लोक त्याचे उपदेश लक्ष देऊन ऐकतात आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन देतात. आपण देखील यशस्वी होऊन असे काही करत आहात तर असं करू नका.एखाद्या ज्ञानी माणसाने उपदेश दिले तर चांगलेच आहे. 
 
3 वाईटाकडे वळतो आणि ढोंगी बनतो- नवीन श्रीमंत बनलेला किंवा यशस्वी बनलेला प्रत्येक माणूस वाईट मार्गाकडे वळतो. आपले स्टेट्स बनवून ठेवण्यासाठी आपले यश किंवा श्रीमंती दाखवितो. आणि हे करताना अनेक प्रकारचे ढोंग अवलंबवतो. असं करून तो इतर श्रीमंत कुळांची नक्कल करतो तसेच पाश्चात्य संस्कृतीची उत्कृष्ट कामगिरी दाखवतो. तो स्वतःला श्रेष्ठ आणि सर्वोत्कृष्ट दाखविण्यासाठी काहीही करू शकतो.