गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

प्रत्येक स्त्री सासूला सांगू इच्छिते या 12 गोष्टी

1. विश्वास ठेवा: कोणती गोष्ट कशी करायची हे लपवू नका. मी आपल्यासारखी सुग्रण नसली तरी मी शिकेन.
 
2. व्यक्ती म्हणून वागवा: आपल्याला आदर्श सून हवी असली तरी प्रथम मला व्यक्ती म्हणून वागणूक द्या. मग सर्व सुरळीत होईल.
3. चांगल्या सासू बना: परिपूर्ण नाही तरी चांगली सासू बनण्याचा प्रयत्न करा. स्वत:साठी इच्छित असलेली वागणूक मला द्या.

4. आपला मुलगाच माझा नवरा: माझा नवरा आपला मुलगा आहे जे जाणून आहे मी. म्हणून त्याच्यासमोर सदैव आपल्या दोघींमधून एकाला निवडण्याचा हट्ट नको. त्याला मोकळा श्वास घेऊ द्या.
 
5. मला आपली घृणा नाही: माझं आपल्यावर माझ्या आईएवढे प्रेम नसलं तर तेवढा सन्मान नक्कीच आहे.
 
6. नातेवाइकांकडे काना डोळा करा: आपल्यात भांडण लावण्यासाठी नातेवाईक टपलेलेच असतात. तमाशा बघायला कोणाला आवडत नाही. म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायला नको.

7. मलाही कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे वागवा: माझ्याकडून हे कुटुंब आपलं समजण्याचा आग्रह पण मला कुटुंबाचा भाग मानायला कपाळावर आठ्या. स्वत:च्या मुलीएवढं प्रेम देऊ शकत नसला तरी मुलाची बायको म्हणून प्रेम आणि सन्मानाने वागवा.  
 
8. वेगळे व्यक्तिमत्त्व: आपण दोन पृथक व्यक्ती आहोत. आपली वेग-वेगळी आवड, छंद, सवयी आहेत. म्हणून कोण शहाणा आणि कोण मूर्ख यात न पडता आपल्या हिशोबाने जगू या.  
9. मी सांभाळेन माझी मुले: आपल्याला चूक वाटतं असेल पण विश्वास करा मी पण आपल्या मुलांचा वाईट होऊ देणार नाही. जसा माझा नवरा जन्माला आल्यावर आपण त्याला सांभाळले तसेच मी पण माझ्या मुलांकडे लक्ष देऊ शकते. अधूनमधून दिलेला सल्ला स्वागतायोग्य आहे पण सतत त्यांच्याशी कसं वागायचं हे ऐकणे मात्र कठिण जाईल.

10. माझ्यात काही दोष आहेत: जसे आपल्या मुलात आहेत तसेच माझ्यातही काही दोष आहे. आणि त्याची नातेवाइकांमध्ये बोंबाबोल करण्यापेक्षा सरळ येऊन मला सांगितले तर मला नक्कीच आवडेल. मी ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करेन.
 
11. माझेही स्वप्न आहेत: आपल्या इच्छित असलेली सुग्रण सून होण्याव्यतिरिक्त माझेही काही स्वप्न, करिअर, जगण्याचा उद्देश्य, पुढे वाढण्याची ओढ आहे. मला संधी द्या मी संसार आणि करिअर हे दोन्ही व्यवस्थित पार पडण्याचा प्रयत्न करेन.
 
12. आपल्या मुलाला स्वत:च डोकं आहे: आपला मुलगा माझ्या इशार्‍यावर नाचतो, मी म्हणण्याप्रमाणेच वागतो हा विचार डोक्यातून काढून टाका. त्याच्या वागण्या, बोलण्याचा मान त्यालाच द्या कारण त्याला स्वत:चं डोकं आहे.