Marathi Biodata Maker
✕

Safety Tips on Diwali: दिवाळीत फटाके उडवताना चुकूनही करू नका या चुका

Updated: सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (08:12 IST)
 
दिवाळीच्या आनंदी वातावरणाची मजा लुटताना थोडेसे सुरक्षिततेचे भानही ठेवायला हवे. या दीपावलीत उत्साहाच्या भरात अपघात होऊ शकतो. आनंदावर विरजण पडते आणि त्याचे दुष्परिणाम कायम स्वरुपाचे होऊ शकतात.
 
पालकांनी मुलांसोबत राहावे  
कमी आवाजाच्या तीव्रतेच्या आणि शोभेच्या फटाक्यांचा वापर करावा.  तसेच ते राहत्या घरापासून दूर मोकळ्या मैदानावर लावावेत. लहान मुले फटाके लावत असताना मोठ्या माणसाने तेथे उभे असणे आवश्यक आहे. एवढी दक्षता प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून घेतली तरी ध्वनी वायू प्रदूषण आपण थोड्याफार प्रमाणात रोखू शकतो. पैसे खर्च करुन बहिरेपणा, अस्थमा, रक्तदाब, खोकला, घशाचे विकार अशा प्रकारची विकतची दुखणी का बरे घ्यावीत? दीपावली ही दिव्यांची असते, आवाजाची नसते तो दीपोत्सव आहे.
 
फटाक्यांच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्या-
तिमिराकडून तेजाकडे नेणारा तसेच दुष्प्रवृतींचा नाश हा खरा या सणाचा उद्देश आहे. पण संपूर्ण वातावरणात मिसळलेला जीवघेणा धूर, धूळ आणि कानाचे पडदे फाडणारे कर्णकर्कश आवाज करणार्‍या फटाक्यांची आ‍तषबाजी करुन हा सण साजरा करण्याचा मार्ग कुठला हे कळत नाही. आवाज न करणार्‍या फुलबाजी, सुरसुर्‍या, टिकल्या, अनार हे लखलखीत प्रकाश देणार्‍या फटाके वाजविणे हे एकवेळ समजू शकते, पण फटाक्यांचा तोफा डागणे हे मात्र आपण टाळलेच पाहिजे.

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments