शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: रविवार, 31 जानेवारी 2021 (10:03 IST)

काही सोप्या किचन टिप्स -

* प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्ड वर जे डाग लागतात त्यांना स्वच्छ करण्यासाठी त्यांच्या वर एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि त्यावर अर्धा लिंबू पिळून द्या. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने देखील त्यावर बेकिंग सोडा घालून लिंबू पिळून द्या आणि चोळून स्वच्छ करा. नंतर चॉपिंग बोर्ड 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा. नंतर लिंबाने हळुवार हाताने चॉपिंग बोर्ड स्वच्छ करा. स्टीलच्या स्क्रबरने चोळून स्वच्छ करा. असं केल्याने चॉपिंग बोर्डवरील सर्व डाग नाहीसे होतील. 
जर आपल्याकडे लाकडाचे चॉपिंग बोर्ड आहे तर त्याच्या वर थोडस मीठ घालून लिंबाने चोळून घ्या. त्यावरील लागणारे भाजीचे डाग देखील स्वच्छ होऊन चॉपिंग बोर्ड स्वच्छ होईल. आता हे पाण्याने स्वच्छ करून घ्या. चॉपिंग बोर्ड पूर्वी प्रमाणे नवं होईल. 
 
* केळी लवकर खराब होतात केळी जास्त काळं चांगले ठेवण्यासाठी वॉलपेपर घेऊन त्याच्या वरील भागावर गुंडाळून द्या. असं केल्यानं केळी खराब होणार नाही आणि केळी ताजे राहतील. 
 
* पोळी ची कणिक कशी मळावी या साठी कणिक मध्ये थोडस मीठ मिसळा आणि या मध्ये पाणी घालून गोळा बनवा.  10 ते 15 मिनिटे असेच ठेवा. काही वेळा नंतर त्यामध्ये थोडस तेल घाला आणि पुन्हा एकदा मळून घ्या अशा प्रकारे कणिक मळल्याने पोळी मऊ आणि फुगलेली बनेल. 
 
* कांदा चिरल्यावर त्याच्या तीक्ष्ण वास हाताला लागतो. तो वास काढण्यासाठी हातावर बेकिंग सोडा घाला आणि चोळून हात धुवून घ्या. असं केल्याने हातावरील कोणत्याही प्रकारच्या भाजीची वास आणि कांद्याचा वास नाहीसा  होतो.