1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (17:30 IST)

कुकिंग टिप्स : उपवासाचे पदार्थ करताना या टिप्स अवलंबवा

उपवासाला लोक अनेकदा शेंगदाणे, साबुदाणे, कुट्टुचे पीठ,मखाणे आणि साखर वापरतात. आपण देखील ह्या गोष्टींना वापरत असाल तर हे लहान -लहान टिप्स आपल्या कामी येतील. चला तर मग जाणून घेऊ या.
 
टिप्स- 
1  साबुदाणा भिजत घालताना हे करा- 
 
उपवासात जास्त पदार्थ साबुदाण्याने बनतात. या पासून बनवलेले पदार्थ खायला आवडतात. कारण या पासून बनलेले पदार्थ चविष्ट असतात आणि चटकन बनतात.
* जर आपण साबुदाणा जास्त काळ भिजत ठेवलं तर हे तळायला आणि शिजायला जास्त वेळ घेईल. वडे करताना तळण्यासाठी तेल  जास्त लागत.
* साबुदाणा ठराविक वेळेसच भिजत घाला. जर ह्याचे वरील भाग पारदर्शक दिसत असल्यास ते वापरण्यासाठी खूप चांगले आहे.चांगल्या भिजलेल्या साबुदाण्यात तेल कमी लागत.आपण साबुदाणा हाताने दाबून बघितल्यावर देखील आपणास समजेल की साबुदाणा भिजला आहे की नाही.
 
2  शेंगदाणे तळून न घेता भाजून घ्या-
 
उपवासाचे बरेच पदार्थ बनविण्यात शेंगदाणे वापरतात.शेंगदाण्याचा वापर करताना जास्त तळले जातात.ही पद्धत चुकीची आहे.असं न करता शेंगदाणे तव्यावर किंवा कढईत भाजून घ्या. तेल न वापरता हलकं सोनेरी किंवा तपकिरी होई पर्यंत भाजून घ्या. असं केल्याने साबुदाण्याच्या खिचडीत,वडे किंवा इतर पदार्थांमध्ये तेल कमी लागेल.
 
3 शिंगाड्याचे पीठ अशा प्रकारे मळून घ्या -
 
शिंगाड्याच्या पिठाला सामान्य पिठाप्रमाणे मळू नका. कारण हे पीठ कॉर्नफ्लोअर सारखे असते. या मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त पडल्यावर हे मळून घ्यायला खूप त्रास होऊ शकतो. या त्रासा पासून वाचण्यासाठी कणीक मळताना थोडंसं तेल घाला आणि लागत-लागत पाणी घालून कणीक मळावी.