रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:19 IST)

चादर जुनी झालीये? फेकू नका, अशा प्रकारे वापरा

bedsheet
कोणतीही वस्तू एका वेळेपर्यंत वापरण्यात येते मग अनेकदा वस्तू अगदी टाकाऊ स्थितीत नसली तरी वापरण्याची इच्छा नसते अशात आपण ही बेडशीट वापरुन कंटाळला असाल किंवा चादरीचा रंग फिका पडत असेल तर ती फेकून न देता इतर उपयोग देखील करता येतो-
पलंगावर चादर घालण्याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींसाठी याचा वापर करता येतो ते कशा प्रकारे जाणून घ्या-
 
डोअरमॅट्स बनवा
बाजारात अनेक प्रकाराचे डोअरमॅट्स अनेक डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत. पण जर एकही पैसा खर्च न करता जर आपल्याला मॅट्स मिळत असतील तर? होय हे शक्य आहे. 
 
जुन्या चादरी वापरुन आपण डोअरमॅट्स तयार करू शकता. आपण वेगवेगळ्या शीट्स जोडून जाड डोअरमॅट्सही बनवू शकता. तुम्हाला मेटला चांगला लूक द्यायचा असेल तर त्याभोवती अतिरिक्त कापड लावून वेगळा लूक तयार करता येऊ शकतो.
 
किचन टॉवेल बनवा
स्वयंपाकघरातील कपाटात कापड किंवा पेपर ठेवले जातात. अशा परिस्थितीत आपण मसाल्यांच्या बॉक्सखाली जुनी चादर देखील घालू शकता. याशिवाय स्वयंपाकघरातील साफसफाईसाठी वापरण्यासाठी लागणारे कपडे जुन्या चादरींचे तयार केले जाऊ शकतात.
 
पिशव्या बनवा
चादरी चांगल्या स्थितीत असतील तर त्याच्या पिशव्या तयार करतात येतील. तुम्ही इतर कापड वापरुन त्याला आकर्षक लूक देऊ शकतात.
 
पडदा तयार करा
तुम्ही जुन्या शीटमधून खिडक्यांसाठी पडदे देखील बनवू शकता. तुम्हाला फक्त खिडकीच्या आकाराची शीट कापून त्याचा शिवण मारायची आहे. यानंतर एका बाजूने शीटमध्ये तार टाकून पडदा वापरता येऊ शकतो.