Festival Posters
✕

नवरात्रीत मासिक पाळी आल्यास काय करावे? व्रत- पूजा या प्रकारे पूर्ण करावे

Updated: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2026 (15:06 IST)
 
नवरात्रीच्या काळात मासिक पाळी आल्यास घाबरून न जाता किंवा स्वतःला दोषी न मानता खालील नियमांनुसार व्रत व पूजा पूर्ण करता येते:
• व्रत सुरू ठेवावे: तुम्ही जर ९ दिवसांच्या उपवासाचा संकल्प केला असेल, तर मासिक पाळी आल्या तरी उपवास सोडण्याची गरज नाही, तुम्ही उपवास सुरू ठेवू शकता. परंतु शरीराला अशक्तपणा किंवा त्रास होत असेल, तर प्रकृतीनुसार उपवासात बदल करू शकता.
• मूर्ती किंवा पूजा साहित्याला स्पर्श करू नये: या दिवसांत देवीच्या मूर्तीला, तसबिरीला, कलशाला किंवा कोणत्याही पूजा साहित्याला स्पर्श करू नये.
• मानसिक पूजा आणि नामस्मरण करावे: भौतिक किंवा प्रत्यक्ष पूजा न करता, दूर बसून किंवा मनातल्या मनात देवीचे नामस्मरण, दुर्गा मंत्र जप किंवा दुर्गा चालीसा ऐकावी.
• इतर सदस्यांची मदत घ्यावी: जर तुम्हीघरात घटस्थापना किंवा अखंड दिवा लावला असेल, तर रोजची पूजा, दिवा लावणे आणि नैवेद्य दाखवण्याचे काम घरातील इतर सदस्यांकडून करून घ्यावे.
• कन्या पूजन कसे करावे: अष्टमी किंवा नवमीच्या दिवशीही मासिक पाळी सुरू असल्यास, कन्यांना स्वतः स्पर्श करू नये, त्यांचे पाय धुणे किंवा जेवण वाढणे हे काम घरातील दुसऱ्या सदस्यामार्फत करावे आणि तुम्ही दूरूनच त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा.
• आरोग्याची काळजी घ्यावी: मासिक पाळीत अशक्तपणा येऊ नये म्हणून पाणी, फळे,नारळ पाणी आणि पौष्टिक आहार घ्यावा.
 
धार्मिक श्रद्धा
धार्मिक श्रद्धांनुसार, देवावरील श्रद्धा ही सर्वोपरि आहे. मासिक पाळी ही महिलांमध्ये एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे तुमचा उपवास खंडित होत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचा उपवास चालू ठेवू शकता; देवी दुर्गा तुमची श्रद्धा समजून घेईल.
 
अस्वीकरण: या लेखातील माहिती पूर्णपणे खरी किंवा अचूक आहे असा वेबदुनिया दावा करत नाही. या संदर्भात अचूक माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments