Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिचा नकार....महत्त्वाचा आहे का?

Updated: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (19:18 IST)
 
स्त्रिया भावनिक असल्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून त्यांच्यावर घातलेले बंधन. त्यांच्यावर पडणार्‍या वेगवेगळ्या जवाबदार्‍यांमुळे त्या पुरुषांपेक्षा अधिकच तणावाखाली जगतात. शारीरिक दृष्ट्या बघितले तर मासिक पाळी, गरोदरपणा, प्रसूती आणि नंतर रजोनिवृत्ती. हे सर्व स्त्रियांमध्ये आढळल्यामुळे नैराश्य आणि इतर भावनिक समस्या तसेच मानसिक ताण सहन करणे त्या आपल्या भाग्यात घेऊन येतात. तरी स्त्री पुरुषापेक्षा ताणतणावाच्या परिस्थितीत जास्त चिकाटीने तग धरते. शारीरिक त्रास सहन करूनही कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची नैसर्गिक ताकद जणू तिला देवाचा आशीर्वाद समजावा. त्यातून सध्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहण्याची हौस स्त्रियांना सशक्त असल्याची जाणीव नक्कीच करून देत आहे पण आधुनिकतेची आव्हाने पेलताना तिची दमछाक होते. 
 
घरातून बाहेर पडल्यावर तिलाही बाहेरच्या जगात रमण्याचं मन होतं, ती ते आनंदाचे क्षण जगू देखील बघते पण कुठेतरी कुटुंबाला वगळून आनंदाचे हे क्षण तिला दोषी असल्याचे जाणीव करून देतात. अनेकदा शारीरिक रूपात ती कुठेही असली तरी मानसिक रुपाने कुटुंबात गुंतलेली असते, याचे कारण फक्त आणि फक्त पूर्वीपासून समाजाने घातलेले बंधन. काळ बदलला असला तरी तिच्या जबावदार्‍या कमी न होत उलट वाढतच चालल्या आहेत. संस्कृतीरक्षकांची मर्जी राखण्यात स्त्रिया आजही मानसिक तणावाच्या चक्रात अडकून आहेत.
 
हे चक्र केवळ जवाबदार्‍यांवरच थांबत नाही तर लैंगिक शोषण, मानसिक आणि शारीरिक छळ त्यात भर घालत असतं. आज कितीही सुशिक्षित कुटुंब दिसत असलं तरी पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी बायकांवर जोर दाखवण्याची वृत्ती तशीच आहे. अशात स्त्रिया पुरुषांपेक्षा कितीतरी पट सहनशील आणि बळकट आहे हे सांगण्याची वेगळ्याने गरज भासत नाही. तिच्या ओठांवर कधीही नकार नसतोच कारण नकार दिल्यावर समाजाने आखलेल्या चौकटीत आपण एक संपूर्ण स्त्री म्हणून बसत नाही किंवा एक मुलगी, एक बहीण, एक पत्नी, एक सून, एक आई म्हणून आपण अपयशी होत असल्याची भावना तिलाच तिची खाऊ लागते. आणि येथून सुरू होतो प्रवास स्त्री मानसिक रुपाने कमकुवत असल्याचे सिद्ध करण्याचा. 
 
आज किती तरी नवीन जोडपे गोडी-गुलाबीने संसार करताना बायकोला सर्व स्वातंत्र्य असल्याचं सांगत असले तरी वेळ पडल्यावर अगदी शालजोडीतून तू तुझी जबाबदारी पार पडण्यात किती कमी पडते हे दाखवायला मागे पुढे बघत नाही.
 
फक्त गरज आहे तिला नकार देण्याची हिंमत देण्याची. मग तो नकार न कळत बळजबरीने तिच्या अंगावर घातलेल्या जबावदार्‍यांचा असो, तिला आवडत नसलेल्या एखाद्या पदार्थाची चव असो, तिचा छंद नसलेल्या गोष्टी असो वा शारीरिक संबंधासाठी दिलेला नकार असो. कारण नकार देणे तिचा हक्क आहे हे ती विसरून गेली आहे किंबहुना तिला लहानपणापासून हे विसरायला भाग पाडलेले आहे. नकार दिल्यामुळे तिला कमी न आखता तिच्यासोबत सामान्य व्यवहार केल्यास पुरुष हे माणूस असल्याचं सिद्ध करू शकतात. तिच्या नकाराला सन्मान द्या आणि बघा ती आणखीच निखार येईल आणि ती अजून आत्मविश्वासाने आपल्याला यशाच्या पायर्‍या चढण्यास मदत करेल.
About Author
रूपाली बर्वे
मीडिया क्षेत्रातील २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रूपाली बर्वे या एक अष्टपैलू पत्रकार आणि संपादक आहेत. मागील २० वर्षांपासून त्या 'वेबदुनिया' पोर्टलशी जोडलेल्या असून सध्या 'असिस्टंट एडिटर' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी फील्ड रिपोर्टिंग, कंटेंट रायटिंग, डेस्क एडिटिंग आणि डिजिटल मीडिया अशा विविध स्तरांवर काम केले असून, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती.... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मुरुमांचा त्रास कमी करायचा? घरातील या नैसर्गिक साहित्याने तयार करा फेस मास्क

Monsoon Care Tips: मान्सूनमध्ये एसीचा चुकीचा वापर पडू शकतो महागात, योग्य तापमान जाणून घ्या

लव्ह मॅरेजसाठी पालकांची संमती हवी आहे? या सोप्या टिप्स नक्की वापरा

नैतिक कथा : व्यापारी आणि तीन उंट, गोष्ट वस्तुस्थितीची

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments