रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (09:36 IST)

मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. उस्मानाबादमधील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील.
 
उद्धव ठाकरे सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावला (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) जातील. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तुळजापूरमार्गे अपसिंगा-कात्री येथे जातील. दुपारी १२ वाजता अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाला जातील. दुपारी एक वाजता पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा व अभ्यागतांना भेटून पत्रकारांशी संवाद साधतील. दुपारी दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूरला येऊन तेथून विमानाने मुंबईला परत येतील.