शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 मार्च 2022 (11:08 IST)

जीवनात येणारे आव्हाने एक वरदान आहेत

महाराज दशरथ यांना मुलं नसतांना ते खूप दु:खी होत. पण अशा वेळी त्यांना एका गोष्टीमुळे मनाला आधार मिळे ज्यामुळे ते कधीही निराश होत नसे. ती गोष्ट म्हणजे श्रावणाच्या वडिलांनी त्यांना दिलेला शाप...
 
श्रावणाच्या वडिलांनी त्यांना शाप दिला होता की "ज्याप्रमाणे मी पुत्रवियोगामुळे तडफडून मरत आहे, त्याचप्रमाणे तू सुद्धा पुत्रवियोगामुळे तडफडून मरशील. "
 
दशरथांना हे माहित होते की हा शाप नक्कीच खरा होईल आणि या जन्मामध्ये मला नक्कीच मुलगा होईल म्हणजेच या शापाने दशरथाला मुलगा होईल हे सौभाग्य शापाने प्राप्त झालेच होते.
 
अशीच एक घटना सुग्रीवांबरोबरही घडली होती. वाल्मिकी ऋषी रामायणात वर्णन करतात की जेव्हा सुग्रीव वानरांना सीतेच्या शोधासाठी पृथ्वीच्या निरनिराळ्या दिशेला पाठवत होते तेव्हा ते बरोबर वर्णन करत होते की कुठल्या दिशेला तुम्हांला काय व कुठला प्रदेश सापडेल तुम्हांला नक्की कोणत्या दिशेने जाणे योग्य आहे किंवा नाही हे ते ठामपणे सांगत होते.
 
भगवान श्रीराम सुग्रीवचे हे भौगोलिक ज्ञान पाहून चकित झाले. त्यांनी सुग्रीवाला विचारले, सुग्रीव तुला हे कसे माहित आहे…? त्यावेळी सुग्रीवाने श्रीरामाला सांगितले की "जेव्हा मी माझा भाऊ बळीच्या भीतीने भटकत होतो, तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर मला कोणीही आश्रय दिला नाही आणि यामुळे माझी संपूर्ण पृथ्वी शोधुन झाली आणि त्याने मला समग्र ज्ञान प्राप्त झाले त्यामुळेच सीतेला पृथ्वीतलावावर कुठे शोधायचे हे मी सांगु शकतो.
 
आता सुग्रीवला या संकटांचा सामना करावा लागला नसता तर त्याला भौगोलिक ज्ञान प्राप्त झाले नसते आणि सीतेला शोधणे अवघड गेले असते. म्हणूनच कोणीतरी खूप सुंदर म्हटले आहे "अनुकूलता म्हणजे भोजन आहे, प्रतिकुलता म्हणजे जीवनसत्व आहे आणि जीवनात येणारे आव्हाने एक वरदान आहेत आणि हे समजुन जे वागतात तेच खरे पुरुषार्थी आहे."

भगवंताकडून येणारी प्रत्येक फुल जर आशीर्वाद असेल तर तर फुलाचे काटे देखील आपण वरदान मानले पाहिजे.
अर्थ- 
जर आज आपण मिळत असलेल्या सुखाने आनंदी असाल आणि जर पुढे कधी दु:ख, आपत्ती, अडथळे आले तर घाबरू नका. न जाणो कदाचित पुढे मिळणाऱ्या आनंदाची ती तयारी केली जात असली पाहिजे. यासाठी नेहमी सकारात्मक रहा.

- सोशल मीडिया