Dharma Sangrah
✕

पावसाळ्यात मैद्याऐवजी बेसन वापरून घरीच हलवाई-स्टाईल कुरकुरीत जिलेबी बनवा, पाककृती अत्यंत सोपी

Updated: मंगळवार, 7 जुलै 2026 (17:29 IST)
पाकासाठी :
साखर: १.५ कप
पाणी: १ कप
वेलची पूड: १/२ लहान चमचा
लिंबाचा रस: ४-५ थेंब (यामुळे साखर गोठत नाही)
केशर: ५-६ पाकळ्या (ऐच्छिक)
 
कृती:
साखरेचा पाक बनवणे
एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात केशर आणि वेलची पूड घाला.
पाक आपल्याला एक तारी पेक्षा किंचित कमी (चिकट पाक) करायचा आहे.
पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात लिंबाचा रस घाला, ज्यामुळे पाक थंड झाल्यावरही पातळ राहील.
 
जिलेबीचे पीठ तयार करणे
एका मोठ्या भांड्यात बेसन नीट चाळून घ्या, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत.
आता त्यात दही आणि चिमूटभर खाण्याचा रंग घालून मिक्स करा.
थोडे थोडे पाणी घालत हे पीठ व्यवस्थित फेटून घ्या. पीठाची कन्सिस्टन्सी (दाटपणा) भज्यांच्या पिठापेक्षा थोडी पातळ असावी.
सर्वात शेवटी, जिलेबी तळायला घेण्यापूर्वी पिठात बेकिंग सोडा (किंवा इनो) घाला आणि हलक्या हाताने एकाच दिशेने मिक्स करा.
 
जिलेबी तळणे आणि पाकात टाकणे
एका सपाट तळाच्या कढईत (पॅनमध्ये) तूप किंवा तेल मध्यम गरम करा. (जिलेबीसाठी तूप किंवा तेल जास्त खोल नसावे, अर्धा ते पाऊण इंच पुरेसे आहे).
आता हे बेसनाचे पीठ जिलेबी मेकर, सॉसची बॉटल किंवा दुधाच्या रिकाम्या पिशवीत भरून त्याला छोटा कोपरा कापून घ्या.
गरम तेलात हाताने गोल-गोल फिरवत जिलेबीचा आकार द्या.
जिलेबी दोन्ही बाजूंनी छान हलकी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
तेल व्यवस्थित झटकून, गरम जिलेबी थेट कोमट साखरेच्या पाकात टाका.
जिलेबी पाकात केवळ १ ते २ मिनिटे राहू द्या, जेणेकरून ती पाक नीट शोषून घेईल. त्यानंतर ती प्लेटमध्ये काढून घ्या.
 
काही खास आणि महत्त्वाच्या टिप्स :
पिठाची कन्सिस्टन्सी: पीठ खूप पातळ झाले तर जिलेबी तेलात पसरून चपटी होईल आणि खूप घट्ट झाले तर जिलेबी पाडता येणार नाही आणि ती पाक शोषून घेणार नाही.
पाकाचे तापमान: जिलेबी पाकात टाकताना पाक कोमट असावा, खूप उकळता किंवा अगदी थंड नसावा.
आबंट दही: दह्यामुळे जिलेबीला छान हलकी आंबट चव आणि कुरकुरीतपणा येतो, जो हलवाईच्या जिलेबीमध्ये असतो.
 
गरमागरम, रसरशीत आणि कुरकुरीत बेसनाची जिलेबी तयार आहे! तुम्ही ती रबडीसोबत किंवा अशीच एन्जॉय करू शकता.
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

दिवाळीत त्वचेला हवा पार्लरसारखा ग्लो? घरच्याघरी करा हा सोपा उपाय, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!

सूर्यास्तानंतर फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य वेळ

अग्निसार प्राणायामाचे फायदे: बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी कशी होते मदत? जाणून घ्या योग्य पद्धत

वाकड्या तोंडाचा मासा; नैतिक कथा सोल माश्याची

नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळे! नारळ-गुळाच्या सारणाची खास करंजी करून पाहा

पुढील लेख
Show comments