1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूप्रमाणे डायनिंग रूम (भोजन गृह) कसा असावा

'डायनिंग रूम', 'भोजन गृह आणि स्वैपाकघर एकाच माळ्यावर असणे बरे असते. भोजन गृहात भिंतीवर हिरवा आणि पिवळा रंग असणे बरे.
 
डायनिंग टेबल भोजनगृहाच्या पश्चिमेकडे ठेवावे. भोजनगृह स्वैपाकघराच्या डाव्या बाजूला आणि लागून असावे. 
 
भोजनगृहाचे प्रवेश दार आणि मुख्य दार एका सरळ रेषेत नसावे. डायनिंग टेबल चौरस किंवा चतुष्कोणिय असावे, अंड्याच्या किंवा इतर कोणत्याही आकाराचे टेबल चांगले नसते.  
 
डायनिंग टेबल भोजनगृहाच्या मधोमध ठेवण्यात यावे. डायनिंग टेबलच्या खुर्च्या सम संख्येत असाव्या, कारण विषम संख्येत खुर्च्या असण्याने एकाकीपणाची जाणिव वाढवणार्‍या वाटू लागतात. 
 
भोजनगृहात डायनिंग टेबल भिंतीला लाऊन किंवा घडी करून ठेऊ नये.