1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:28 IST)

Vastu Tips स्वयंपाकघर, डायनिंग टेबल आणि स्टोर रूमसाठी काही महत्वाच्या वास्तू टिप्स

स्वयंपाकघर : स्वयंपाकघराच्या खिडक्या पूर्व-पश्चिम दिशेकडे असाव्या, ज्यायोगे वातावरणाचे विधायक धागे आकर्षित होऊ शकतील. ओट्यावर कोणते ही कपाट किंवा आलमारी ठेऊ नका, कारण त्यामुळे अकल्पित परिस्थिती उत्पन्न होण्याची भिती निर्माण होऊ शकेल. भोजन गृह आणि स्वयंपाकघर एकाच माळ्यावर असणे बरे असते. भोजन गृहात भिंतीवर हिरवा आणि पिवळा रंग असणे बरे.
 
डायनिंग टेबल : डायनिंग टेबल चौरस किंवा चतुष्कोणिय असावे, अंड्याच्या किंवा इतर कोणत्याही आकाराचे टेबल चांगले नसते. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या मधोमध ठेवण्यात यावे. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या पश्चिमेकडे ठेवावे.
 
लहान मुलांची खोली : मुलांच्या खोलीत गणपती किंवा सरस्वतीचे चित्र लावावे. मुलांच्या खोलीत पलंग या प्रकारे ठेवावा ज्यायोगे मुलांचे डोके दक्षिणकडे असेल. शरीराचे चुंबकत्व कायम राखण्यासाठी याची मदत होते. मुलांसाठी ईशान्येस किंवा घराच्या पश्चिमेकडे खोली असावी. मुलींसाठी वायव्येस खोली असावी. मुलांच्या खोलित रॅक किंवा कपाट दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावे.
 
स्टोर रूम : स्टोर रूममध्ये रॅक आणि अलमारी दक्षिण आणि पश्चिम दिशेमध्ये ठेवण्यात यावी.÷दिवाण किंवा पलंग पेटीत वस्तूंची कधीही साठवण करू नये, कारण त्यामुळे घरातले चुंबकीय वातावरण बिघडते.
 
पूजा गृह : पूजागृहात देवता कधीही कोपर्‍यात ठोऊ नका. पूजागृहात किंवा देवळात भंगलेली मूर्ती ठेवण्यात येऊ नाही. पूजागृहाचे दार उत्तर किंवा पूर्वेकडच्या भिंतीत असावे.
 
तिजोरी : तिजोरीच्या खोलीचे दार ईशान्येस, पूर्वेस किंवा उत्तरेकडे ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लॉकर दक्षिण दिशेत ठेवावे आणि ते उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे उघडले जावे.