घरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स
* घराचे मुख्य दार दक्षिण मुखी नसावे. यावर पर्याय नसल्यास दाराच्या अगदी समोर मोठा आरसा लावा ज्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही.
* घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक किंवा ऊँ आकृती लावावी.
* घराच्या पूर्वोत्तर दिशेत पाण्याचे कळश ठेवावे.
* घराच्या खिडक्या आणि दारं अश्या ठिकाणी असावे की सूर्य प्रकाश अधिक ते अधिक वेळेपर्यंत घरात येत राहावा ज्याने घरातील लोकं आजारी पडत नाही.
* भांडण आणि वाद विवादापासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये फुलांचा गुलदस्ता ठेवावा.
स्वयंपाकघरात देव घर नसावं.
* बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये. धार्मिक आस्थेने जुळलेली कोणतीही वस्तू शयनकक्षात नसावी.
* घरात प्रसाधन गृहाजवळ देवघर नसावे.
* घरातील मुख्य पुरूषाचे शयनकक्ष दक्षिण-पश्चिम दिशेत असावे.
* घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे.