Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोड खावेसे वाटल्यास केळीपासून बनवा ही डेझर्ट; उपवासासाठी देखील चालतील

Updated: मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 (20:44 IST)
 
बनाना पॅनकेक्स 
मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मिष्टान्न म्हणून हा उत्तम पर्याय आहे.
कृती-
पिकलेली केळी कुस्करून घ्या. त्यात गव्हाचे पीठ किंवा मैदा, गूळ/साखर, थोडे दूध आणि चिमूटभर वेलची पूड घालून मिश्रण तयार करा. तव्यावर थोडे तूप सोडून छोटे पॅनकेक्स तयार करा. वरून मध किंवा चॉकलेट सिरप घालून सर्व्ह करा.
 
केळीचा हलवा 
जर केळी जास्त पिकली असतील, तर त्यांचा फेकून न देता हलवा बनवा.
कृती- 
कढईत तूप गरम करून त्यात कुस्करलेली केळी परतून घ्या. त्यात साखर किंवा गूळ घाला. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात ड्राय फ्रूट्स आणि वेलची पूड टाका. हा हलवा चवीला दाक्षिणात्य 'बनाना हलवा' सारखा लागतो.
 
बनाना स्मूदी
हे आरोग्यदायी आणि पोटभरीचे डेझर्ट आहे.
कृती-
मिक्सरमध्ये केळी, थंड दूध, थोडे दही किंवा ओट्स, भिजवलेले बदाम आणि मध घालून फिरवून घ्या. वरून चिया सीड्स किंवा सुका मेवा घालून सर्व्ह करा.
 
केळीची बर्फी
कृती-
केळीचा गर, ओले खोबरे आणि गूळ एकत्र शिजवून घट्ट गोळा तयार करा. त्यात तूप आणि वेलची घाला. हे मिश्रण एका थाळीत पसरवून त्याच्या वड्या पाडा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Sweet Dish चविष्ट केळीची खीर
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Tasty Banana Cutlets केळीचे कटलेट रेसिपी

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रक्षाबंधन विशेष प्रसंगासाठी घरीच क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक बनवा

मधुमेही व्यक्ती गुळाचा चहा पिऊ शकतात का? गुळाचे फायदे, दुष्परिणाम आणि योग्य प्रमाण याबद्दल जाणून घ्या

क्रिमिनोलॉजी मध्ये पीएचडी करून करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

किशोरवयात मेकअप आणि स्किनकेअर करताना ‘या’ चुका टाळा; त्वचा राहील निरोगी आणि चमकदार

कर्करोगापासून बचावासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा; ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

पुढील लेख
Show comments