Daily Horoscope
✕

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Updated: बुधवार, 6 मे 2026 (16:52 IST)
सर्वप्रथम गव्हाच्या कुरडयांचे मध्यम तुकडे करून घ्या. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात या कुरडया ५ ते १० मिनिटे भिजत ठेवा. कुरडई मऊ झाली की पाणी निथळून हाताने हलकी पिळून बाजूला ठेवा.
कढईत तेल गरम करा. तेल तापले की त्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या. त्यानंतर त्यात ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाका.
आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो छान गुलाबी होईपर्यंत परता. या भाजीला कांदा थोडा जास्त असेल तर चव छान लागते.
कांदा परतला की त्यात हळद आणि लाल तिखट (किंवा घरी असलेला कांदा-लसूण मसाला) टाका. मसाला जळू नये म्हणून गॅस मंद ठेवा.
आता भिजवून घेतलेली कुरडई कढईत टाका आणि चवीनुसार मीठ घाला. (लक्षात ठेवा: कुरडई बनवतानाही मीठ असते, त्यामुळे बेतानेच मीठ टाकावे).
सर्व व्यवस्थित एकत्र करून झाल्यावर कढईवर २-३ मिनिटे झाकण ठेवा आणि मंद आचेवर एक छान वाफ काढा.
शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सजवा.
 
खास टीप:
ही भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरम भाकरीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही हवं असल्यास यात थोडा ओला नारळ किसूनही किंवा भाजलेल्या दाण्याचा कूट टाकू शकता, ज्यामुळे भाजीला वेगळीच चव येते.
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

सिमला मिरची खाण्याचे फायदेच नाही, तर तोटेही आहेत! 'या' लोकांनी सेवन करताना घ्यावी विशेष काळजी

दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे सारखीच? दोन्ही आजारांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

आरोग्यासाठी सुपरफूड नाचणीच्या ५ चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीस

पुढील लेख
Show comments