suvichar
✕

महाराष्ट्रीयन माणसाच्या दिलाचा तुकडा! "पिठलं भाकरी" अस्सल मराठमोळी रेसिपी

Updated: शुक्रवार, 5 जून 2026 (14:26 IST)
झणझणीत गावरान पिठलं 
काही ठिकाणी पिठलं थोडे पातळ (घोटलेले) केले जाते, तर काही ठिकाणी थोडे सुके (ज्याला झुणका म्हणतात). आपण इथे सरबरीत पिठलं बनवणार आहोत.

साहित्य-
बेसन (हरभरा डाळीचे पीठ): १ कप
कांदा: २ मोठे (बारीक चिरलेले)
लसूण-मिरचीचा ठेचा: २ मोठे चमचे (पिठलं झणझणीतच छान लागतं)
मोहरी आणि जिरे: प्रत्येकी १ लहान चमचा
हिंग: पाव लहान चमचा
हळद: अर्धा लहान चमचा
कोथिंबीर: भरपूर (बारीक चिरलेली)
तेल: ३ ते ४ मोठे चमचे (गावरान पिठल्याला तेल थोडे जास्त लागते)
मीठ: चवीनुसार
पाणी: २ ते अडीच कप

कृती -
१. फोडणी तयार करणे: कढईत (शक्यतो लोखंडी कढई वापरावी) तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे आणि हिंग घालून छान तडतडू द्या. त्यानंतर कढीपत्ता घाला.
२. कांदा आणि ठेचा परता: आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता. कांदा मऊ झाला की, त्यात लसूण-हिरवी मिरचीचा ठेचा घाला आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत नीट परतून घ्या.
३. हळद आणि पाणी: फोडणीत हळद घाला आणि लगेचच २ ते अडीच कप पाणी ओता. सोबत चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून पाण्याला छान उकळी येऊ द्या.
४. बेसन मिक्स करणे: पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करा. आता एका हाताने बेसन थोडे थोडे पाण्यात टाका आणि दुसऱ्या हाताने चमच्याने (किंवा रवीने) ते सतत ढवळत राहा, जेणेकरून पिठाच्या गाठी होणार नाहीत.
५. वाफ काढणे: पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यावर कढईवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर पिठल्याला ५ ते ७ मिनिटे मस्त वाफ काढून घ्या. मध्ये एकादा चमचा चालवा जेणेकरून पिठलं खाली लागणार नाही.
६. जेव्हा पिठलं कढईच्या कडा सोडायला लागेल, तेव्हा समजावे की पिठलं छान शिजले आहे. वरून भरपूर कोथिंबीर घाला.

मऊ आणि फुगलेली ज्वारीची भाकरी
१. पीठ मळणे: परातीत ज्वारीचे ताजे पीठ घ्या. त्यात थोडे थोडे कोमट किंवा साधे पाणी घालून पीठ हाताच्या तळव्याने  चांगले रगडून, मऊ मळून घ्या. पीठ जितके छान मळाल, तितकी भाकरी मऊ होते आणि कडा फाटत नाहीत.
२. भाकरी थापणे: पिठाचा उंडा तयार करा. पोळपाटावर किंवा परातीत थोडे सुके पीठ भुरभुरा. त्यावर उंडा ठेवून हाताने गोलाकार फिरवत भाकरी छान थापून घ्या.
३. भाकरी भाजणे: तवा चांगला गरम करून घ्या. थापलेली भाकरी तव्यावर टाका (पिठाची बाजू वर आली पाहिजे).
४. पाणी लावणे: वरच्या बाजूला हाताने थोडे पाणी लावून घ्या. पाणी थोडे सुकले की भाकरी उलटून घ्या आणि दुसरी बाजू मध्यम आचेवर छान भाजून घ्या.
५. फुगवणे: दुसरी बाजू पूर्ण भाजली की भाकरी थेट गॅसच्या आचेवर किंवा तव्यावरच कपड्याने दाबून छान टम्म फुगवून घ्या.
ALSO READ: झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण
परफेक्ट गावरान थाळी कशी सजवाल?
ताटात गरमागरम पिठलं ठेवा, त्यावर कच्चे शेंगदाण्याचे तेल किंवा साजूक तूप सोडा. सोबत मऊ गरमागरम भाकरी, तोंडी लावायला मऊ पडलेला कच्चा कांदा (हाताने फोडलेला) आणि चमचमीत मिरच्यांचा खर्डा (ठेचा).
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: प्रत्येकाला आवडतील अशा ५ वेगवेगळ्या कढीच्या पाककृती
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

रूप चौदसला चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो? हा खास स्क्रब दिवाळीपर्यंत त्वचेला देईल चमकदार लुक

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आरोग्यावर होतोय परिणाम? निरोगी लिव्हरसाठी दररोज करा ही ५ योगासने!

नैतिक कथा : वडिल म्हणाले मुलाला दानात आनंद आहे

चॉकलेट बर्फी आणि ओरियो लाडू: लहान मुलांसाठी खास दिवाळी स्वीट रेसिपीज

पुढील लेख
Show comments