संबंधित माहिती
- उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवा! या ताजेतवाने करणाऱ्या चटण्या प्रत्येक जेवणाला बनवतील खास
- थिएटर किंवा मॉलसारखे गरमागरम कुरकुरीत आणि मऊ पॉपकॉर्न घरीच कुकरमध्ये फक्त ५ मिनिटांत
- Fruit Pizza रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा; लहान मुलांच्या पार्टीसाठी उत्तम पर्याय
- सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हे ५ आरोग्यदायी पदार्थ
- प्रत्येकाला आवडतील अशा ५ वेगवेगळ्या कढीच्या पाककृती
'चिझ-गार्लिक पराठा भन्नाट रेसिपी', अगदी हॉटेल स्टाईल चव घरीच
चिझ-गार्लिक पराठा' रेसिपी
नेहमीचा बटाटा किंवा गोबी पराठा खाऊन कंटाळा आला असेल, तर हा हॉटेल स्टाईल गार्लिक नानसारखा लागणारा पराठा नक्की ट्राय करा.
साहित्य-
गव्हाचे मळलेले पीठ
२ चमचे बटर
१ चमचा बारीक चिरलेला लसूण
कोथिंबीर
चिली फ्लेक्स आणि चिझ
ALSO READ: चविष्ट चिली गार्लिक पराठा रेसिपी
कृती-
एका वाटीत बटर, बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर एकत्र करून 'गार्लिक बटर' तयार करा. गव्हाच्या पिठाची नेहमीसारखी पोळी लाटून घ्या. त्यावर हे गार्लिक बटर सर्व बाजूंनी पसरवून लावा. वरून भरपूर चिझ किसून टाका आणि थोडे चिली फ्लेक्स स्प्रिंकल करा. आता पोळीला चौकोनी किंवा त्रिकोणी आकारात दुमडून करून हलक्या हाताने परत लाटून घ्या. तव्यावर साजूक तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी खरपूस आणि कुरकुरीत भाजून घ्या. गरमागरम चिझ गार्लिक पराठा सॉससोबत सर्व्ह करा!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मिक्स व्हेजिटेबल पराठा रेसिपी
