Marathi Biodata Maker
✕

ढाबा सारखी दालफ्राय घरीच बनवा, रेसिपी जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 24 मे 2024 (20:34 IST)
 
तूर डाळ - 150 ग्रॅम
 टोमॅटो - 2
 कांदा - 1
 साजूक तूप - 2 चमचे
 आले
 हिरवी मिरची -2
धणेपूड -1 चमचा 
मीठ - चवीनुसार
 तमालपत्र 
 लाल मिरची 
 गरम मसाला - 1/2 टीस्पून
 हळद पावडर - 1 टीस्पून
 हिंग - 1/8 टीस्पून
 जिरे -1/2 टीस्पून
 
कृती 
दालफ्राय करण्यासाठी सर्वप्रथम डाळ चार ते पाच तास भिजत ठेवा. नीट भिजवल्यानंतर कुकरमध्ये दोन वाट्या पाणी, चवीनुसार हळद आणि मीठ घालून गॅसवर ठेवा. पहिली शिट्टी वाजल्यानंतर गॅस मध्यम करा आणि नंतर आणखी ४ शिट्ट्या होऊ द्या. शिजल्यावर डाळ गॅसवरून काढून घ्या.
 
डाळ थंड होत असतानाच फोडणीसाठी मसाले तयार करा. हा मसाला तयार करण्यासाठी कढईत दोन चमचे तूप घालून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात तमालपत्र टाकून तळून घ्या. यानंतर कढईत बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेले आले घालून ते सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. मसाला भाजल्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला.यानंतर पॅनमध्ये गरम मसाला, धनेपूड आणि हळद घालून व्यवस्थित शिजवा. टोमॅटो वितळून मसाल्यात मिसळले की, तव्यात शिजलेली डाळ घाला.
यानंतर शेवटी कढईत तूप गरम करा. गरम तुपात लाल मिरची, हिंग आणि जिरे घालून परतून घ्या. दालफ्राय खाण्यासाठी तयार आहे. राईस किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited by - Priya Dixit  
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

संत्र्याची साले फेकून देण्याऐवजी, घरीच शुद्ध आणि सुगंधी नैसर्गिक साबण बनवा; फायदे जाणून घ्या

तुम्हाला देखील मोबाईलवर प्रोफेशनल सेल्फी काढायचे का? मग या सोप्या ट्रिक नक्की वापरून पहा

इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांसाठी भरती; परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय निवड !

निवृत्तीनंतर शहरात राहणाऱ्या व्यक्तींनी तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी हे छंद जोपासले पाहिजेत

गाजराचा हलवा बनवताना या चुका टाळा, नाहीतर त्याची चव आणि पोत बिघडू शकतो

पुढील लेख
Show comments