शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (10:51 IST)

मोड आलेल्या मेथीची उसळ, अत्यंत पोष्टीक

साहित्य : 200 ग्रॅम मेथीदाणे, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे पूड, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा मोहरी, फोडणीसाठी 2 चमचे तेल.
 
कृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करावी. या फोडणीत कांदा परतून घ्यावा नंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड व मीठ घालावे. या मिश्रणात मग मोड आलेले मेथीदाणे टाकून त्यावर झाकण ठेवावे. मधून मधून हालवत राहावे. दाणे शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर व लिंबाचा रस घालून पोळी सोबत सर्व्ह करावे.