Daily Horoscope
✕

थिएटर किंवा मॉलसारखे गरमागरम कुरकुरीत आणि मऊ पॉपकॉर्न घरीच कुकरमध्ये फक्त ५ मिनिटांत

Updated: गुरूवार, 4 जून 2026 (18:25 IST)
हळद: १/२ छोटा चमचा (छान पिवळा रंग येण्यासाठी)
मीठ: चवीनुसार
 
कुकरमध्ये पॉपकॉर्न बनवण्याची कृती-
१. कुकर गरम करा:
सर्वात आधी गॅसवर कुकर ठेवा आणि त्यात तेल आणि बटर (किंवा तूप) घालून मध्यम आचेवर गरम होऊ द्या.
 
२. मसाले मिक्स करा:
बटर वितळल्यावर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ टाका. चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्या.
 
३. मक्याचे दाणे टाका:
आता यात १/२ कप मक्याचे दाणे टाका आणि चमच्याने चांगले ढवळा, जेणेकरून सर्व दाण्यांना बटर आणि हळद व्यवस्थित लागेल.
 
४. मुख्य स्टेप (कुकरची शिट्टी आणि रिंग काढा):
महत्त्वाची टीप: कुकरचे झाकण लावण्यापूर्वी त्याची शिट्टी आणि रबरची रिंग नक्की काढून ठेवा. जर तुम्ही शिट्टी काढली नाही, तर कुकरमध्ये वाफ साठून पॉपकॉर्न दमट आणि मऊ पडतील, कुरकुरीत होणार नाहीत.
 
दाणे फुटू द्या:
आता कुकरचे झाकण लावा किंवा उलटे ठेवा आणि गॅसची आच मध्यम ते हाय ठेवा. अवघ्या १ मिनिटात तुम्हाला कुकरमधून दाणे फुटण्याचा 'पट-पट' असा आवाज येऊ लागेल. साधारण २ ते ३ मिनिटांत सर्व दाणे फुटून कुकर पूर्ण भरेल. जेव्हा कुकरमधून आवाज येणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हा गॅस बंद करा. १ मिनिट कुकर तसाच ठेवून मग झाकण उघडा. तुमचे गरमागरम, कुरकुरीत आणि मऊ बटर पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत!
 
टेस्ट वाढवण्यासाठी काही भन्नाट वेरियशन्स:
पेरी-पेरी पॉपकॉर्न: पॉपकॉर्न तयार झाल्यावर वरून थोडा पेरी-पेरी मसाला स्प्रिंकल करा.
चीझ पॉपकॉर्न: गरम पॉपकॉर्नवर चीझ पावडर टाकून कुकर हलवून घ्या.
मसाला पॉपकॉर्न: बटरसोबत थोडं लाल तिखट आणि चाट मसाला घालून मिक्स करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: घरीच बनवा रेस्टॉरंट सारखी बटर गार्लिक नान
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पनीर पॉपकॉर्न रेसिपी
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी निबंध मराठीत

मक्याच्या पोह्यांचा चिवडा (Corn Flakes Chivda): कमी तेलात बनवा मसालेदार चिवडा

Sardar Vallabhbhai Patel Jayanti Speech In Marathi सरदार वल्लभभाई पटेल जयंती भाषण

वांगी खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या! कोणत्या लोकांनी वांगी खाताना घ्यावी काळजी?

Rashtrapati Bhavan Job: राष्ट्रपती भवनात सरकारी नोकरीची संधी कशी मिळते? थेट भरती, पात्रता आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या!

पुढील लेख
Show comments