गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (12:06 IST)

घरीच बनवा रेस्टॉरंट सारखी बटर गार्लिक नान

Garlic Naan
साहित्य-
3.5 कप मैदा
यीस्ट
1 चमचा साखर
चवीनुसार मीठ
अर्धा कप दही
कोमट दूध
तेल 
अर्धा चमचा लसूण पेस्ट 
तीन चमचे बटर
एक चमचा कोथिंबीर 
  
कृती-
सर्वात आधी एक मोठ्या बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये मीठ घालावे. आता एक भांड्यात यीस्ट आणि मिक्स करून कोमट पाण्यामध्ये घालून ठेवावे. यीस्ट वरती येतांना दिसले की, दूध, दही आणि थोडेसे तेल मिक्स करावे. आता यामध्ये मीठ घातलेला मैदा घालावा. यामध्ये लसूण पेस्ट देखील घालावी. आता गोळा मळून तयार करावा. आता हा गोळा कमीतकमी एक तास भिजत ठेवावा. आता हाताला तेल लावून गोळे बनवून घ्यावे.  व दहा मिनिट कपड्यांनी झाकून ठेवावे. आता तीन चमचे बटर घेऊन त्यामध्ये लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालावी. आता आपले तंदूर ओव्हन तयार करून त्याला तेल लावावे आणि या वर नान पसरवावी. व शेकून घ्यावी. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही पॅन चा उपयोग करू शकतात. आता नान ला तयार केले बटर लावावे व शेकून घ्यावे. आता एका बाजूने शेकल्यानंतर पलटवून  घ्यावी. व परत बटर लावावे. तर चला तयार आहार आपली रेस्टॉरंट सारखी बटर गार्लिक नान, गरम सर्व्ह  करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik