Daily Horoscope
✕

घरच्या घरी बनवा चटपटीत स्ट्रीट फूड

Updated: गुरूवार, 19 मार्च 2026 (19:29 IST)
टीप: कांदा चिरल्यावर त्याला मीठ लावून ५ मिनिटे ठेवा, सुटलेल्या पाण्यातच बेसन भिजवा (पाणी वरून टाकू नका), यामुळे भजी जास्त कुरकुरीत होतात.
 
२. झटपट पावभाजी 
रेस्टॉरंटसारखी पावभाजी आता कुकरमध्ये १० मिनिटांत तयार होईल.
साहित्य: बटाटे, फ्लॉवर, मटार, गाजर (सर्व भाज्या कुकरला ३ शिट्ट्या करून शिजवून मॅश करा).
फोडणी: कढईत बटर आणि तेल गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो परता.
मसाला: पावभाजी मसाला (२ चमचे), कश्मीरी लाल तिखट (रंगासाठी) आणि कसुरी मेथी घाला.
फिनिशिंग: मॅश केलेल्या भाज्या फोडणीत मिक्स करा, वरून भरपूर कोथिंबीर आणि बटर सोडा.
ALSO READ: पावभाजीमध्ये बीट घालल्याने त्याचा रंग आणि चव खरोखरच वाढते का?
३. घरगुती भेळ 
मुलांना किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यावर हा सर्वात सोपा पर्याय आहे.
साहित्य: चिरमुरे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, लिंबाचा रस.
सीक्रेट मसाला: चाट मसाला, थोडं काळं मीठ आणि घरी बनवलेली हिरवी चटणी (पुदिना-मिरची).
सर्व्ह करताना: वरून बारीक शेव आणि खारे दाणे टाका.
 
स्ट्रीट फूडला 'हॉटेल'सारखी चव देण्यासाठी ३ टिप्स 
शक्य असल्यास लोखंडी भांड्यांचा वापर करा, त्यामुळे पदार्थाला तो विशिष्ट 'स्मोकी' फ्लेवर मिळतो.
चाट मसाला आणि काळं मीठ: कोणत्याही कोरड्या नाश्त्यावर वरून थोडा चाट मसाला शिंपडल्यास चव लगेच बदलते.
बटर आणि कोथिंबीर: पावभाजी, मिसळ किंवा वडापाव बनवताना कोथिंबीर आणि अमूल बटरचा सढळ हाताने वापर करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments