रविवार, 5 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified गुरूवार, 5 मे 2022 (21:06 IST)

मदर्स डे : आई तर ती आईच असते, हेंच खरं

mothers day wishes
सगळ्यांनीच ठरवलं आईचं वर्णन शब्दांत करावं,
तिच्या बद्दल जेजे वाटतं, ते कागदावर उतरवाव,
प्रत्येक जण लिहू लागलेत मनापासून,
काय वर्णावी आपापल्या आईची थोरवी,हे आठवून,
झालं थोड्यावेळात सगळ्यांच लिहून, पान भर,
कुणी रचले होतें काव्य, कुणी आईवर स्तुतीपर,
जेव्हा बघितलं सर्वांचं लिखाण,आशर्य घडले,
लिखाण साऱ्यांचे एकच वाटू लागले,
आईवर लिहायचं म्हणजे एकसारखे च होणार,
एक दुसऱ्याची आई वेगळी का असणार?
आई तर ती आईच असते, हेंच खरं,
कसा काय कुणी वेगळं व्यक्त होईल बरं!
अनादी काळापासून तिचं स्थान एकच,
कुणी ही किती ही लिहा, आशय नेहमीच असेल एकच!!
...अश्विनी थत्ते