गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (09:36 IST)

एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीकडे वळवले

एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्ली विमानतळाकडे वळवण्यात आले. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकारींनी सांगितले आहे. सध्या विमान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. व विमानाचा तपास सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर विमान दिल्ली विमानतळाकडे वळवण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकारींनी सांगितले आहे.
 
अधिकारींनी सांगितले की विमान सध्या नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे आणि प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.
 
तसेच एअर इंडियाचे फ्लाइट AI 657 मध्ये 135 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. सर्वांना दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले असून विमानाला आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आहे.

Edited By- Dhanashri Naik