suvichar
✕

मुंबई कोस्टल रोडवर बीएमडब्ल्यू गाडी बॅरियरला तोडून खाली पडली; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Updated: सोमवार, 21 सप्टेंबर 2026 (08:48 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे ५:२० च्या सुमारास मुंबईच्या कोस्टल रोडवर एका बीएमडब्ल्यू गाडीचा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जात होती आणि लोटस जेट्टीजवळ बांधकाम सुरू असलेल्या पार्किंग लॉटमध्ये घुसली. वळणावर बाहेरील बॅरियरला तोडून खाली पडली  या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.
ALSO READ: अमरावतीमध्ये दुष्काळाचे संकट, ८ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ लागू करीत पीक नुकसानीचे मूल्यांकन सुरू
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गाडीच्या अतिवेगामुळे चालकाला वळणाचा योग्य अंदाज आला नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून येते की, अपघाताच्या वेळी गाडी भरधाव वेगात होती.  अपघातानंतर, कारमधील चौघांनाही तात्काळ जवळच्या बीएमसी-संचालित नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शनाया गज्जल (२१), आदित्य जक्सानिया (२०) आणि धीर्या सेठ (१७) यांना मृत घोषित केले. तर आदित्य ओसवाल याला गंभीर अवस्थेत रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.   पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातात सामील असलेले चारही तरुण-तरुणी मूळचे अहमदाबादचे होते. अपघातात सामील असलेली बीएमडब्ल्यू कार गज्जलच्या कुटुंबाची असल्याचे मानले जात आहे.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

LIVE: पुढील ॲग्रोव्हिजनपूर्वी किमान ५,००० शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उद्दिष्ट

नागपूर येथे नितीन गडकरी यांनी पुढील वर्षापूर्वी ५,००० शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान देण्याचे लक्ष्य ठेवले

स्पेनच्या किनाऱ्याजवळ १०० स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात! ८ मृतदेह सापडले

मुंबईच्या वरळी जेटीवर आधुनिक हेलिपॅड बांधले जाणार! बीएमसी स्थायी समितीची मंजुरी

भिवंडी रोड स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल; तिकीट खिडकीवर कर्मचारी मोबाईलमध्ये मग्न !

पुढील लेख
Show comments