Festival Posters
✕

मुंबईतील हाजी अली दर्ग्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, पोलिसांनी सुरु केला तपास

Updated: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (10:41 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील हाजी अली दर्ग्याला गुरुवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्या व्यक्तीने दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात फोन करून आवारात बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी 5 वाजता हा कॉल आला होता.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने अपशब्द वापरले आणि दर्ग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. याबाबत हाजी अली दर्ग्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
 
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि बॉम्बशोधक पथकाने दर्ग्यात पोहोचून तपासणी केली, पण काहीही संशयास्पद आढळून आले नाही. तारदेव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited By- Dhanashri Naik 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

भारतीय संघाने महिला चॅम्पियनशिप २०२५-२९ मध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला ९ गडी राखून पराभूत केले

भारतीय टेबल टेनिसपटू हरमीत देसाई आणि यशस्विनी घोरपडे जोडी उपांत्य फेरीत दाखल

MLC Election 2026: चार राज्यांतील २८ जागांसाठी मतदान संपले, निकाल कधी जाहीर होणार?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात ९२.१२ टक्के मतदान झाले

LIVE: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात ९२.१२ टक्के मतदान

पुढील लेख
Show comments