Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'माझ्या मुलाशी नाही तर माझ्याशी लढा', सीएम शिंदेंचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान

Updated: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (10:01 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे यांनी केलेल्या काही टिप्पण्यांचा संदर्भ शिंदे यांनी दिला. 
 
तसेच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “तुम्ही कोणाच्या मुलावर टीका का करताय? स्पर्धा करायची असेल तर या आणि त्याच्या वडिलांशी स्पर्धा करा. तसेच पुढे सीएम शिंदे म्हणाले की, आमच्या कामाला मिळालेल्या प्रतिसादामुळे उद्धव ठाकरे आतून तुटले आहे आणि त्यामुळेच ते अशा कमेंट करत आहे, असे टीकास्त्र शिंदेंनी ठाकरेंवर सोडले. तसेच शिंदे म्हणाले की, आपल्यावरील आरोपांना आम्ही आपल्या कामाने उत्तर देऊ.
 
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
गेल्या शनिवारी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना खुले आव्हान दिले होते आणि त्यांना सोडून गेलेले नेते पक्षात परतणार नाहीत, असे सांगितले होते. तसेच कोणत्याही गद्दाराला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. व विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता भाजप आणि शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देईल, असे देखील ठाकरे म्हणाले. दीड महिन्यात हे गद्दार आमच्याकडे नोकरीसाठी येतील कारण ते बेरोजगार होतील. निवडणुकीनंतर मी कोणत्याही गद्दाराला नोकरी देणार नाही.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

अमेरिका इराणवर हल्ला करणार नाही, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली राहील

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने १३ सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत अव्वल ५ मध्ये स्थान मिळवले, एकूण पदकांची संख्या ३९ झाली

खासदार सुप्रिया सुळे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटी/सीटीईटी अनिवार्य

३२ कोटी रुपयांच्या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी हत्येचा कट रचला! ७ जणांना अटक

पुढील लेख
Show comments