suvichar

इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज होत असताना त्यात स्फोट, 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (10:51 IST)
पर्यावरणासाठी बनवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्फोट झाल्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका स्कूटरच्या बॅटरीमध्ये स्फोट झाला. त्यामुळे एका 7 वर्षाच्या मुलचा मृत्यू झाला. ही घटना मुंबईतील वसई परिसरात घडली. स्फोटामुळे बालक गंभीररित्या भाजला. मात्र, स्कूटरमधील स्फोटाची ही घटना 23सप्टेंबरच्या रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 मीडिया रिपोर्ट्सनुसार, सब्बीर अन्सारी आपल्या आजीसोबत राम दास नगरमध्ये असलेल्या घरात हॉलमध्ये झोपला होता. अंसारीच्या वडिलांनी झोपण्यापूर्वी इलेक्ट्रिक स्टोव्हर चार्जिंगसाठी लावला होता. मात्र पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान अचानक स्फोटाचा आवाज आला, त्यामुळे मुलाचे पालक जागे झाले.
 
 स्फोटामुळे शेजारीच झोपलेला अन्सारी भाजला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवसांच्या उपचारानंतर अखेर मुलाचा मृत्यू झाला. त्याचवेळी या अपघातात आजीला किरकोळ दुखापत झाली आहे. स्कूटरची बॅटरी कधी चार्ज झाली हे स्पष्ट झालेले नाही. तो पहाटे अडीच वाजता चार्जिंगसाठी बसवण्यात आल्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा दावा आहे. याआधीही काही ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
 
 Edited by : Smita Joshi

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

World Sports Journalists Day २ जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिन का साजरा केला जातो?

मुंबई-अमृतसर एक्सप्रेसमध्ये भीषण आग, प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला

LIVE: ठाकरे गटाचे १३ आमदार शिंदे यांच्या संपर्कात

ठाकरे गटाचे १३ आमदार शिंदे यांच्या संपर्कात… शिवसेना आमदाराच्या ‘ऑपरेशन टायगर ३ चा दावा

हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी त्याने १२ तास सायकल चालवली, चाहत्याला दिले दीड लाख रुपये

पुढील लेख
Show comments