शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (08:58 IST)

खडकवासला धरण 75 टक्के भरलं, 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे, त्यामुळे धरणावरील दाब कमी रहावा व नवीन पाणी भरावे म्हणून खडकवासला धरणातून आज 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला , अजूनही विसर्ग होणार आहे.  खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच असून , जोरदार पाणी साठा वाढत आहे. 
तर दुसरीकडे रात्री 11.30  वाजता मुठा नदीपात्रात सोडले असून ते  वाढवले आहे, त्यमुळे नदीकाठच्या  नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे पुणे जिल्हा प्रशसनाचे आवाहन केल आहे.