शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (07:42 IST)

बैठक संपल्यानंतर अमित ठाकरे फुटबॉल जगलिंग करताना दिसले

amit deshmukh
राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. मनविसेच्या माध्यमातून ते महासंपर्क अभियान राबवत आहेत. विविध ठिकाणी जाऊन ते कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. आज ते कर्जमध्ये होते. याठिकाणी बैठक संपल्यानंतर अमित ठाकरे फुटबॉल जगलिंग करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज कर्जतमध्ये प्रसन्न बनसोडे यांच्या पुढाकाराने कोकण कर्जत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचं वाटप करण्यात आलं. अमित ठाकरे यांच्या हस्ते हे स्पोर्ट कीट देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या क्रीडा साहित्य संचात फुटबॉल देखील होता. हा फूटबॉल पाहताच अमित ठाकरे यांनी काही क्षण फुटबॉल जगलिंग (juggling) चा आनंद लुटला. राजकारणासोबतच फुटबॉलवर असलेलं त्याचं प्रेम कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं.