गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (14:26 IST)

घाटकोपर परिसरात कारने धडक दिल्याने 8 जण जखमी

Mumbai accident
घाटकोपर येथे घडलेल्या एका अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात 8 जण जखमी, तर 2 गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
 
मोबाइल चार्जिंग करण्याच्या नादात हा अपघात घडला आहे. ही घटना घडली तेव्हा कारमध्ये बसलेली व्यक्ती मोबाइल फोन चार्जिंग करण्याचा प्रयत्न करत असताना कार सुरू झाली आणि गाडीवर नियंत्रण न मिळवत्या आल्याने हा अपघात घडला.
 
घाटकोपरमधील सुधा पार्क परिसरात बुधवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. कामराज नगर परिसरात राहणारा राजू यादव नावाचा रिक्षा चालक त्याच्या मित्रासोबत कारमध्ये मोबाइल चार्ज करण्यासाठी बसला होता. त्याने ओला चालकाला न विचारता गाडीचे इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि इंजिन सुरु होताच गाडी हळहळू पुढे जायला लागली. तेव्हा त्याने ब्रेक दाबण्याऐवजी एस्कलेटरवर पाय दिल्याने कारने वेग घेतला. ज्यामुळे कार समोर उभ्या असलेल्या रिक्षा आणि कारला जाऊन धडकली. 
 
आठ जणांना या कारने धडक दिली जखमींना स्थानिक रहिवाशांनी राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले.