गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ३८ जणांना घेऊन जाणारी एक फेरी बोट अचानक नादुरुस्त झाली. बोटीत ३४ प्रवासी आणि चार कर्मचारी होते. इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे बोटीतील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने, मदतीसाठी दुसरी बोट वेळेवर पोहोचली आणि सर्वांना सुखरूप गेटवे ऑफ इंडिया जेट्टीवर परत आणण्यात आले. प्राथमिक तपासानुसार फेरी बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून येते.Watch: A ferry carrying 34 passengers and four crew members broke down near Mumbais Gateway of India. Another ferry rescued and towed the boat back, with all 38 people safely reaching shore.
— IANS (@ians_india) September 3, 2026
(Source: Mumbai Police) pic.twitter.com/kz7V08Adpn